Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 16 November 2026, 19:42

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील विद्युत रोहित्र डीपी लक्ष्य करून रात्रीच्या अंधारात त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल आठ ठिकाणी डीपी चोरी केल्याची कबुली दिली आहे .

आरोपींकडून २ लाख २९ हजार ५०० रुपये किमतीच्या १७० किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या विद्युत रोहित्रांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांना मोठा दणका बसला आहे.

दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण ढुके व पोलीस अंमलदार लहानु बांगर हे अरणगाव परिसरात गस्त घालत असताना अरणगाव व उरळगाव गावच्या शिवेवर विद्युत रोहित्र चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांना मिळाली पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देत संशयितांचा शोध सुरू केला यावेळी विनानंबर प्लेटच्या पल्सर मोटारसायकलवरून जाणारे दोघे संशयास्पद आढळले.

पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच त्यांनी मोटारसायकलचा वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना अडविल्यानंतर दोघांनी मोटारसायकल जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतात धूम ठोकली
त्यानंतर पोलिसांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने उसाच्या शेतात शोधमोहीम राबवली. रात्रभर सुरू असलेल्या शोधानंतर सकाळी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते.

प्रदीप राजेंद्र शिंदे (वय २७) व सुनील पोपट केदार (वय २५, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर अशी त्यांची नावे आहेत.

चौकशीदरम्यान त्यांनी डीपीमधील तांब्याच्या तारा चोरण्यासाठी आल्याची कबुली दिली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली .

न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला असता या चोरीच्या घटनांमध्ये आणखी तीन साथीदार सहभागी असल्याचे निष्पन्न झाले
त्यानुसार संदीप यशवंत काळे वय २३, निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ वय २१, दोघे रा. नांदूर, खंदारमळा, ता. संगमनेर, व राजेंद्र सोमनाथ वर्पे (वय ३२, रा. वरवंडी, थापलीवस्ती खंडोबा, ता. संगमनेर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली.

या पथकांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्यांनी पहिल्या दोन आरोपींच्या साथीने शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी रात्रीच्या वेळी विद्युत रोहित्र खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली असून.

त्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या १७० किलो तांब्याच्या तारा हस्तगत केल्या आहेत.

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत २ लाख २९ हजार ५०० रुपये असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार व शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे .

यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक फौजदार लहानु बांगर, पोलीस हवालदार किरण ढुके, रोहिदास पास्त्रे, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे तसेच पोलीस अंमलदार भारत भोसले, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत, नागेश वाघमारे व योगेश भंडारे यांनी सहभाग घेतला होता. या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली किरण ढुके व भारत भोसले हे करीत आहेत.

नागरिकांच्या सतर्कतेला पोलिसांची शाबासकी
डीपी चोरांना पकडण्यासाठी मोलाची मदत करणाऱ्या उरळगाव येथील संतोष सात्रस, विनायक सात्रस, लहू हुजगे, निलेश सात्रस, काळुराम चोरमले व संजय चोरमले या सहा नागरिकांचा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून पोलिसांच्या तपासकार्यात नागरिकांनी दाखविलेली सतर्कता आणि सहकार्य महत्त्वपूर्ण ठरल्याचे सांगत यादव यांनी सर्व नागरिकांचे विशेष कौतुक केले असून पोलिसांसोबत नागरिकांनीही गावाच्या सुरक्षेसाठी जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिक्रापूरमध्ये डीपी चोरांची टोळी जेरबंद! पाच आरोपी अटकेत, आठ चोरींची कबुली; मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार..

Monday, 16 November 2026, 19:42

शिरूर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा कारनामा! ९५ हजारांची लाच अन् कागदपत्र घेऊन पसार; ACB कडून अखेर फिल्मी स्टाईल अटक…

Monday, 16 November 2026, 19:21

अवघ्या साडेसात मिनिटांत चोरलेली फॉर्च्युनर वर्षभरानंतर थेट आंध्र प्रदेशात सापडली! शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Monday, 16 November 2026, 19:15

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp