Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 October 2026, 11:01

लोणी काळभोर, ता. 19 : वाळत घातलेले पाच ड्रेस गायब झाल्याबाबत चर्चा सुरू असताना शेजाऱ्यांनी गैरसमज करून घेतल्याने वाद झाल्याची घटना घडली आहे. या वादात दांपत्याने महिलेच्या डोक्यावर लाकडी फळीने वार करून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गुजरवस्ती परिसरात शनिवारी (ता.17) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामू चराटे व अनिता चराटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्योती गायकवाड (वय 40 ) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती गायकवाड या आपल्या मुलगी आणि मुलासह कदमवाकवस्ती येथील गुजरवस्ती परिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. त्या घरकाम व मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीने धुऊन वाळत घातलेल्या कपड्यांपैकी पाच ड्रेस गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

ज्योती गायकवाड आणि त्यांची मुलगी पार्किंगमध्ये बसून गायब झालेल्या कपड्यांबाबत 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास चर्चा करत होत्या. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या रामू चराटे यांच्या मुलीने ही चर्चा ऐकून आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर रामू चराटे आणि त्यांची पत्नी अनिता यांनी पार्किंगमध्ये येऊन, कपडे कोणी नेले याबाबत आम्हाला का विचारता आणि आमचे नाव का घेता, असे म्हणत वाद सुरू झाला.

यावेळी ज्योती गायकवाड यांनी आपण कोणाचेही नाव घेतले नसल्याचे सांगितले. मात्र, वाद सुरू असताना रामू चराटे याने घराशेजारी पडलेली लाकडी फळी उचलून त्यांच्या उजव्या भुवईवर मारली . तसेच अनिता चराटे हिने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ज्योती गायकवाड यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्या उपचारासाठी ससून रुग्णालयात गेल्या.

 

उपचार घेतल्यानंतर ज्योती गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामू चराटे आणि अनिता चराटे यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),3(5),351(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस ‘अलर्ट’ मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 19 October 2026, 10:29

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04

“गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का?” राणा सूर्यवंशी हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Monday, 19 October 2026, 9:47

दसऱ्याआधी सोनं-चांदी स्वस्त! खरेदीसाठी हीच योग्य वेळ की दर आणखी घसरणार? वाचा

Monday, 19 October 2026, 9:35
Next Post

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp