Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्रानेच केला घात! पुण्यात जुन्या वादाच्या रागातून तरुणावर ॲसिड हल्ला; झटापटीत ४ जण जखमी, नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 9 November 2026, 13:00

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील रामनगर येथे किरकोळ वादातून एका व्यक्तीने आपल्या परिचिताच्या मुलावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्ल्यादरम्यान झालेल्या झटापटीत बाटलीतील द्रवाचे शिंतोडे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि त्याच्या लहान मुलीच्या अंगावरही उडाले. या घटनेत एका चिमुकलीसह एकूण चौघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

नितीन सुंदर जाधव (वय ५२, रा. पांढूलमाण वस्ती, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिवाळीच्या तोंडावर शुक्रवारी (६ नोव्हेंबर) दुपारी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुमित्रा इंद्रपाल डग्ग्या (वय ५२, रा. रामनगर, येरवडा) आणि आरोपी नितीन जाधव हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सुमित्रा यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात मैत्री होती. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपी जाधव हा ॲसिडसदृश द्रवपदार्थाची बाटली घेऊन सुमित्रा यांच्या घरासमोर आला.

तिथे त्याने सुमित्रा यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाच्या अंगावर बाटलीतील द्रवपदार्थ फेकला. हा प्रकार रोखण्यासाठी सुमित्रा यांनी आरोपीच्या हातातील बाटली ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी झालेल्या झटापटीत बाटलीतील द्रवाचे शिंतोडे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारासह त्याच्या लहान मुलीच्या अंगावर उडाले. या घटनेत सुमित्रा डग्ग्या, त्यांचा मुलगा, दुचाकीस्वार आणि त्याची लहान मुलगी असे एकूण चौघेजण जखमी झाले. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची गंभीर दखल घेत येरवडा पोलिसांनी सुमित्रा डग्ग्या यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने कारवाई करत आरोपी नितीन सुंदर जाधव याला अटक करण्यात आली. जखमींना गंभीर दुखापत झाल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: जेवणाच्या बिलावरून जगदंबा हॉटेलमध्ये राडा! माजी सरपंच राहुल काळभोरसह चौघांकडून हॉटेल मालक, कामगार आणि ग्राहकाला मारहाण

Tuesday, 10 November 2026, 14:07

पाडव्याला सोन्याची झळाळी! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.44 लाखांवर; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

Tuesday, 10 November 2026, 13:58

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04
Next Post

खाकीला काळिमा! पुण्यात पोलिसाचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; शारीरिक छळ, जबरदस्ती गर्भपात अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp