Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: जेवणाच्या बिलावरून जगदंबा हॉटेलमध्ये राडा! माजी सरपंच राहुल काळभोरसह चौघांकडून हॉटेल मालक, कामगार आणि ग्राहकाला मारहाण

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 10 November 2026, 14:07

लोणी काळभोर : जेवणाचे ऑनलाइन बिल भरल्यानंतर बिल मिळाल्याची विचारणा केल्यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एंजल हायस्कूलजवळ असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये सोमवारी (ता.9) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या वादातून लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्यासह त्यांचा भाऊ आणि अन्य दोघांनी हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, कामगार तसेच हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाला मारहाण केली आहे. विशेष म्हणजे, घटनेची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या हॉटेल मालकाच्या मुलाला आणि पुतण्यालाही हॉटेलकडे परत येताना डॉमिनोज पिझ्झासमोर अडवून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर (सर्व रा.लोणी काळभोर, ता.हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेल मालक राजेंद्र यदू चौधरी (वय ५६, रा. लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चौधरी हे कदमवाकवस्ती येथील एंजल हायस्कूलजवळ गेल्या 30 वर्षांपासून जगदंबा हॉटेल आहे. 9 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर त्यांनी ऑनलाइन पद्धतीने बिल भरले. त्यानंतर बिल मिळाले का, अशी विचारणा केली असता हॉटेल मालकाने बिल मिळाल्याचे सांगितले. मात्र, याच किरकोळ कारणावरून रामभाऊ काळभोर यांनी हॉटेल मालकाला शिवीगाळ केली.

हा वाद सुरू असताना हॉटेल मालकाचा मुलगा मयूर चौधरी हा मध्यस्थी करण्यासाठी आला. मात्र, त्यालाही शिवीगाळ करून धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. त्यानंतर मयूरने रामभाऊ काळभोर यांना हॉटेलच्या बाहेर काढले. काही वेळाने त्यांचे भाऊ आणि लोणी काळभोरचे माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर हे हॉटेलमध्ये आले. त्यांनीही शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, मयूर चौधरी हा घटनेची तक्रार देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेला असताना, अवघ्या 10 ते 15 मिनिटांत राहुल काळभोर, रामभाऊ काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर हे पुन्हा हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून मालक, कामगार आणि ग्राहकांना शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेले ग्राहक दीपक रमेश कुकरेजा यांनी संबंधितांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे.

याचदरम्यान हॉटेलमधील कामगाराने मयूर चौधरी याला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मयूर आणि त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी हे पोलीस ठाण्यातून हॉटेलकडे परत येत असताना, हॉटेलजवळील डॉमिनोज पिझ्झासमोर राहुल काळभोर, रामभाऊ काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली.

जेवणाच्या बिलावरून सुरू झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान

हॉटेलमधील मारहाण, ग्राहकाला लक्ष्य करणे आणि तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणालाही रस्त्यात गाठण्यापर्यंत पोहचल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे धुडगूस घातला जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी राजेंद्र चौधरी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र ऊर्फ रामभाऊ काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 329(4), 118(1)
332(c), 351(2) व 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: जेवणाच्या बिलावरून जगदंबा हॉटेलमध्ये राडा! माजी सरपंच राहुल काळभोरसह चौघांकडून हॉटेल मालक, कामगार आणि ग्राहकाला मारहाण

Tuesday, 10 November 2026, 14:07

पाडव्याला सोन्याची झळाळी! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.44 लाखांवर; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

Tuesday, 10 November 2026, 13:58

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp