Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 November 2026, 13:30

पुणे : पुण्यात सायबर भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, नागरिकांना वेगवेगळ्या प्रलोभनांत आणि धमक्यांत अडकवून लुटण्याचे प्रकार समोर आले आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’, अमली पदार्थांच्या तस्करीची भीती आणि आभासी चलनात (क्रिप्टोकर आय) गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरांनी लाखांची फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत.

कर्वेनगरमधील ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी गंडा घातला. नाशिकमधील एका बँकेची २कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, त्यात तुमचे नाव असल्याचे सांगून चोरांनी त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवली. मालमत्ता जप्त करण्याची धमकी देऊन कारवाई टाळण्याच्या नावाखाली या महिलेकडून आरटीजीएसद्वारे ३२ लाख रुपये उकळण्यात आले. नंतर आणखी पैशांची मागणी केल्यावर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे उघडकीस आले. वारजे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दुसऱ्या एका घटनेत, आंबेगाव बुद्रुकमधील एका नागरिकाला दिल्लीच्या दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे भासवत सायबर चोरांनी टार्गेट केले. मोबाईल क्रमांकाचा वापर ड्रग्स तस्करीमध्ये झाल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली. या कारवाईतून वाचण्यासाठी ५ लाख २० हजार रुपये उकळण्यात आले. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तिसऱ्या घटनेत, बिबवेवाडी भागात एका तरुण व्यावसायिकाची ५ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक झाली. आभासी चलनात भरघोस परतावा मिळण्याचे आमिष दाखवून चोरांनी त्याला जाळ्यात ओढले आणि पैसे उकळले. परतावा न मिळाल्याने तरुणाने पोलिसांत धाव घेतली असून, बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. सायबर भामटे नागरिकांना अशा भूलथापा देत असून, कोणत्याही संशयास्पद कॉल्स किंवा धमक्यांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50
Next Post

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp