Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाडव्याला सोन्याची झळाळी! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.44 लाखांवर; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 10 November 2026, 13:58

पुणे : आज बलीप्रतिपदा म्हणजेच पाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याच्या बाजारपेठेत तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दीपावलीच्या या उत्साहात अनेकजण आपल्या जोडीदारासाठी सोने खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. मागील काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार झाली असून, जानेवारी महिन्यातील विक्रमी उच्चांकावरून सोन्याच्या भावात सुमारे 23 ते 24 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली होती. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव पुन्हा सावरल्याने ग्राहकांचे लक्ष याकडे लागले आहे.

आज 10 नोव्हेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,44,760 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, कोलकाता, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,44,610 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,32,560 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोने 1,43,550 रुपये आणि 22 कॅरेट सोने 1,31,580 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.

जागतिक बाजारातील तेजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घट यांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याला बळकटी मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट गोल्ड’चा भाव 4,107.01 डॉलर प्रति औंस झाला असून सोमवारी त्यात एक टक्क्याची वाढ झाली होती. यंदाच्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात जवळपास 60,000 कोटी रुपयांच्या सोन्याचा व्यवसाय झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

दुसरीकडे, सोन्याच्या किमती वाढत असताना चांदीच्या बाजारात मात्र घसरण सुरूच आहे. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी चांदीचा भाव 2,04,900 रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात चांदीने 4 लाख रुपये प्रति किलोग्रामचा उच्चांक गाठला होता. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ‘स्पॉट सिल्व्हर’चा भाव 52.78 डॉलर प्रति औंस इतका आहे. एकूणच, पाडव्याच्या या शुभ प्रसंगी सोन्याच्या झळाळीमुळे सराफा बाजारात आनंदाचे वातावरण आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News: जेवणाच्या बिलावरून जगदंबा हॉटेलमध्ये राडा! माजी सरपंच राहुल काळभोरसह चौघांकडून हॉटेल मालक, कामगार आणि ग्राहकाला मारहाण

Tuesday, 10 November 2026, 14:07

पाडव्याला सोन्याची झळाळी! 24 कॅरेट सोन्याचा भाव 1.44 लाखांवर; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचे दर

Tuesday, 10 November 2026, 13:58

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04
Next Post

Loni Kalbhor News: जेवणाच्या बिलावरून जगदंबा हॉटेलमध्ये राडा! माजी सरपंच राहुल काळभोरसह चौघांकडून हॉटेल मालक, कामगार आणि ग्राहकाला मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp