Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनं डायरेक्ट ५ लाखांवर जाणार? तज्ज्ञांच्या अंदाजाने खळबळ; चांदीच्या दरांबाबतही मोठी भविष्यवाणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 9 November 2026, 11:02

मुंबई : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये झालेल्या घसरणीनंतर खरेदीची संधी शोधणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी वर्षभरात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असा अंदाज दिग्गज कमोडिटी तज्ज्ञ सुशील केडिया यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, सोन्याचा भाव दुप्पट, तर चांदीचा भाव जवळपास तिप्पट होण्याची शक्यता आहे.

सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे १.४२ लाख रुपये आहे. आगामी काळात तो वाढून २.८० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा केडिया यांचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे सध्या १.८४ लाख रुपये प्रति किलो असलेल्या चांदीचा भाव जवळपास ५.५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी चांदीने ४.२० लाख रुपये प्रति किलोचा स्तरही गाठला होता.

सुशील केडिया यापूर्वीही कमोडिटी आणि शेअर बाजाराबाबत विविध अंदाज व्यक्त करत आले आहेत. सध्या सोने आणि चांदीचे भाव त्यांच्या विक्रमी पातळीपेक्षा खाली असले, तरी अलीकडे दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ दिसून येत आहे.

दरम्यान, बाजार विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतारामुळे पुढील आठवड्यात सोने आणि चांदीच्या दरांवर दबाव राहू शकतो. अमेरिका आणि इराणमधील तणाव तसेच महागाईची आकडेवारी याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

चीन, अमेरिका, जर्मनी, जपान आणि भारतातील महागाईची आकडेवारीही बाजारासाठी महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांची वक्तव्ये आणि अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी यांचाही सोन्या-चांदीच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. औद्योगिक धातूंच्या मागणीच्या दृष्टीने चीनची आर्थिक आकडेवारीही महत्त्वाची मानली जात आहे.

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कमोडिटी आणि करन्सी रिसर्च) प्रणव मेर यांच्या मते, सोने आणि चांदीच्या किमतींमधील तेजीचा कल सध्या काहीसा कमकुवत झाला आहे. आगामी काळात जागतिक महागाईची आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांची वक्तव्ये बाजाराची दिशा ठरवतील.

देशांतर्गत बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या वायदे दरात मागील आठवड्यात ३,६८२ रुपयांची म्हणजेच जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव १.४२ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. चांदीच्या वायदे दरात ५,६५५ रुपयांची म्हणजेच ३.१५ टक्क्यांची वाढ होऊन भाव १.८४ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर डिसेंबर डिलिव्हरीचे सोने १७६ डॉलरने म्हणजेच ४.५ टक्क्यांनी वाढून ४,०७४.९ डॉलर प्रति औंसवर बंद झाले. तर चांदीचा भाव २.६ डॉलरने म्हणजेच ५.४ टक्क्यांनी वाढून ५१.९४ डॉलर प्रति औंसवर पोहोचला.

प्रणव मेर यांनी सांगितले की, अमेरिकेतील बिगरशेती क्षेत्रातील रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने आणि ग्राहकांच्या विश्वासात सुधारणा झाल्याने सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव निर्माण झाला होता. या घडामोडींमुळे डॉलर आणि अमेरिकेच्या ट्रेझरी बॉण्ड्सच्या यिल्डमध्ये वाढ झाली होती.

आगामी काळात जागतिक आर्थिक घडामोडी, महागाईचे आकडे आणि मध्यवर्ती बँकांचे निर्णय यांचा सोने-चांदीच्या दरांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे केडिया यांनी व्यक्त केलेला दीर्घकालीन तेजीचा अंदाज आणि अल्पकालीन बाजारातील चढ-उतार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये धुराचे लोट! हवेची गुणवत्ता ढासळली; नागरिकांना श्वास घेणेही झाले कठीण

Monday, 9 November 2026, 19:02

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! आता जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार थेट ‘सहापदरी; MSRDC चा नवा प्लॅन काय आहे?

Monday, 9 November 2026, 18:00

मुंबई-पुणे प्रवाशांना ऐन दिवाळीत मनस्ताप! पाचपैकी दोन मार्गिका बंद! सणासुदीच्या काळात दुरुस्तीचे काम काढल्यामुळे वाहनचालकांचे हाल

Monday, 9 November 2026, 16:59

पुण्यात पोलिसांच्या डोळ्यांसमोरच सराईत गुंडाचा थरारक खून! कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित थरार…

Monday, 9 November 2026, 16:03

शरद मोहोळ हत्याकांडात गणेश मारणेला न्यायालयाचा मोठा दणका! पुण्यात ‘नो एंट्री’; विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय

Monday, 9 November 2026, 14:59
Next Post

लक्ष्मीपूजनाच्या रात्री पुण्यात आगीचा तांडव! अवघ्या ८ तासांत ६४ ठिकाणी आग; अग्निशमन दलाची धावपळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp