Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का?” राणा सूर्यवंशी हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 October 2026, 9:47

बारामती : बारामतीतील विमानतळ परिसरात प्रसिद्ध उद्योगपती आणि ‘रामा शिपिंग कॉर्पोरेशन’चे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या हल्ल्यात त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून, उपचारांसाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी हे वैयक्तिक कामासाठी गोजुबाबी गावाच्या हद्दीत रेल्वे पुलाजवळ गेले होते. त्यावेळी स्कुटीवरून आलेल्या मास्क घातलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला. आपण त्यांचे चाहते असल्याचे सांगून फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर त्यांनी फुलांचा गुच्छ दिला आणि अचानक कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या खांद्याला सुमारे 5 ते 6 इंच खोल जखम झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत सरकारी सुरक्षा कर्मचारी नव्हते, असे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर त्यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, हल्ल्यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात गोळीबार झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, घटनास्थळी पाहणी करताना गोळीबाराचे पुरावे किंवा काडतुसे आढळली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गोळीबार झाला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. बारामती विमानतळासारख्या महत्त्वाच्या परिसरात अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. गुन्हेगारांकडून अशा घटना घडत असताना त्यांना रोखण्यासाठी गृहखात्याने प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सुळे यांनी आपल्या पोस्टमधून हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी म्हटले. राज्यात नागरिकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये आणि गुन्हेगारी घटनांना आळा बसावा, यासाठी प्रशासनाने गंभीरपणे काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास बारामती तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाकडून सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. यापूर्वीही सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली असून, त्या घटनेचाही तपासाच्या दृष्टीने विचार केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

लोणी काळभोरच्या ‘चटपटा जंक्शन’ मालकाच्या घरी घरफोडी; 21 लाखांचे सोने लंपास

Monday, 19 October 2026, 11:14

‘डीएसके’च्या 131 मालमत्तांच्या लिलावाला न्यायालयाचा नकार ठेवीदारांच्या परताव्याचा मार्ग मात्र खुला; 11 हजारांहून अधिक ठेवीदारांचे 610 कोटींपेक्षा जास्त रुपये अडकले…

Monday, 19 October 2026, 11:08

“काय गं, माझे कपडे चोरतेस का?” लोणी काळभोरमध्ये कपडेचोरीच्या चर्चेवरून शेजाऱ्यांमध्ये वाद, महिलेवर लाकडी फळीने वार; दोघांवर गुन्हा दाखल

Monday, 19 October 2026, 11:01

टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस ‘अलर्ट’ मोडवर; नेमकं कारण काय? जाणून घ्या

Monday, 19 October 2026, 10:29

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

Monday, 19 October 2026, 10:04

“गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे का?” राणा सूर्यवंशी हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं

Monday, 19 October 2026, 9:47
Next Post

“मला नकार देण्याची शिक्षा मृत्यू?” एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय दामिनीवर चाकूने 17 ते 18 वार करून हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp