Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 June 2026, 18:13

पुणे : पुरंदर तालुक्यात प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे. शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मागणीनुसार जमीन संपादनासाठी संमतीपत्रे व मोबदला स्वीकारण्याची अंतिम मुदत आता 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील सात गावांमधून एकूण 1216 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत 851 हेक्टर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमतीपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे प्रशासनाकडे जमा केली आहेत. सुमारे 70 टक्के जमिनींचे करारनामे पूर्ण झाल्याने त्या क्षेत्राचे संपादन झाल्याचे मानले जात आहे.

विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी आणि मुंजवडी या सात गावांतील सुमारे 1216 हेक्टर म्हणजेच जवळपास 3 हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. 7 मेपासून शेतकऱ्यांनी संमतीपत्रे देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 735 हेक्टर क्षेत्रासाठी संमती मिळाली आहे.

 

दरम्यान, अनेक जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, वारस नोंदी, नाव दुरुस्ती, हक्कसोडपत्रे आणि इतर महसुली प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे काही शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत शेतकऱ्यांना सुमारे 900 कोटी रुपये मोबदल्यापोटी वितरित केले आहेत. तसेच जमिनींच्या सर्च रिपोर्टची प्रक्रिया जलद करण्यासाठी पाच वकिलांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असून 30 जूनपर्यंत अधिकाधिक शेतकऱ्यांनी संमतीपत्रे सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘अण्णा इज बॅक’! विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अण्णा हजारे मैदानात; 2 तासांचे मौन आंदोलन जाहीर

Wednesday, 22 July 2026, 18:55

“विद्यार्थी दहशतवादी आहेत का?” विद्यार्थ्यांवरील अत्याचारावर राहुल गांधींचा संतप्त सवाल; राहुल गांधी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Wednesday, 22 July 2026, 18:51

ठाकरेंना दिलासा!6 बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टाचा दणका; थेट बजावली नोटीस

Wednesday, 22 July 2026, 18:16

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब…

Wednesday, 22 July 2026, 17:54

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Wednesday, 22 July 2026, 17:12

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल! पुण्यात ३३ नवीन वाहतूक विभाग सुरु; नव्या मास्टरप्लॅनमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार?

Wednesday, 22 July 2026, 17:05
Next Post

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.