Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज, आता सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश ; दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 July 2026, 17:12

पुणे : नवी दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात झालेल्या ‘चलो संसद’ आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि आंदोलकांना हटवल्याच्या कारवाईविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर चीफ जस्टीस देवेंद्र उपाध्याय आणि जस्टीस तेजस कारिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावर आता हायकोर्टाने पोलिसांना महत्वाचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवून चार आठवड्यांच्या आत सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान त्यानंतर पुढील चार आठवड्यानंतर पोलीसांच्या उत्तरावर याचिका कर्त्याकडून प्रत्यूतर दाखल करण्यात येणार आहे.या विषयावर 11 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे

याचिकेत नमूद केल्यानुसार, जंतर-मंतरवरून संसद भवनाकडे जाणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अमानुष लाठीचार्ज केला. या अचानक झालेल्या हिंसक कारवाईमुळे अनेक आंदोलक विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले. जरी उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास मान्यता दिली नसली, तरी याचिका दाखल करून घेत पोलिसांकडून अधिकृत स्पष्टीकरण मागितले आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात, ‘नीट’ (NEET) परीक्षा गैरव्यवहाराविरोधात जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती खालावली होती. पोलिसांनी त्यांना तेथून हलवून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात भरती केले होते. पोलिसांच्या या कारवाईला आव्हान देत वांगचूक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली यांनी न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या याचिकेवर निर्णय देत सोनम वांगचूक यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी खाजगी मेदांता रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली आहे.

 

एकंदरीत, जंतर-मंतरवरील या दोन मोठ्या घडामोडींमुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले असून, आगामी सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मेट्रो सुरू होणार होती, पण आला ‘हा’ अडथळा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं उद्घाटन पुढे ढकललं

Thursday, 24 September 2026, 9:06

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27

पाऊस थांबला असं वाटत असतानाच मोठा ट्विस्ट! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Thursday, 24 September 2026, 8:13

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी वरदान? 24 सप्टेंबरला पैसा, काम आणि नात्यांमध्ये काय घडणार?

Thursday, 24 September 2026, 7:46
Next Post

पुण्यातून कोट्यवधी रुपयांची सायबर लुटमार! बँक खातेदाराचा तो एक निर्णय अन् अकाऊंटमधून पैसे गायब...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp