Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 24 September 2026, 8:39

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर प्रवाशांनी भरलेल्या स्लीपर बसला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. बसमध्ये अनेक प्रवासी झोपेत असतानाच ही दुर्घटना घडल्याने मोठी धावपळ उडाली. या घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेची दखल घेतली असून जखमींना आवश्यक उपचार आणि पीडित कुटुंबांना मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस ग्रेटर नोएडाहून आग्राच्या दिशेने जात होती. यमुना एक्स्प्रेस वेवरील झिरो पॉइंटपासून अंदाजे 32 किलोमीटर अंतरावर, जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. रात्री बस प्रवास करत असताना अचानक आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. परिस्थिती लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली.

मात्र काही वेळातच आग वेगाने पसरली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमध्ये अंदाजे 40 ते 50 प्रवासी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

 

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच मृतांची अंतिम संख्या स्पष्ट होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

Thursday, 24 September 2026, 9:32

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर अचानक गोंधळ! मालगाडी बंद पडली अन् प्रवाशांचे झाले हाल

Thursday, 24 September 2026, 9:16

मेट्रो सुरू होणार होती, पण आला ‘हा’ अडथळा; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचं उद्घाटन पुढे ढकललं

Thursday, 24 September 2026, 9:06

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

Thursday, 24 September 2026, 8:54

झोपेतच आगीने घेरलं! 40-50 प्रवाशांनी भरलेली बस अचानक पेटली, 9 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

Thursday, 24 September 2026, 8:39

‘तुम्हाला अटक होणार’ म्हणत ज्येष्ठ महिलेला घाबरवलं! काही दिवसांत 76 लाख लुटले; पुण्यातील महिलेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 24 September 2026, 8:27
Next Post

पुणे भाजपमधून दुःखद बातमी! माजी नगरसेवक प्रवीण वस्ते यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp