Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 27 April 2026, 13:51
daund crime

Daund Police Station

Daund Fraud News : दौंड, (पुणे) : मजूर पुरवण्याच्या बहाण्याने वाटलुज (ता. दौंड) येथील एका शेतकऱ्याची तब्बल 7 लाख 45 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘मजूर देतो’ असे सांगून मुकादमाने वेळोवेळी पैसे उकळले, मात्र गळीत हंगाम सुरू होऊनही मजूर न पाठवता हात झटकल्याने अखेर दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Daund Fraud News

याप्रकरणी अजिनाथ नामदेव लंबाते (वय-54, रा. वाटलुज, ता. दौंड) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर प्रकाश हजारी राठोड (रा. मोरदंड तांडा, जि. धुळे) असे फसवणूक करणाऱ्या मुकादमाचे नाव आहे. लंबाते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राठोड याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Daund Fraud News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिनाथ लंबाते हे शेतीसोबतच ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांनी पाटस येथील ‘भीमा शुगर्स’ कारखान्याशी सन २०२५-२६ च्या हंगामासाठी ऊस वाहतुकीचा करार केला होता. या हंगामासाठी त्यांना मजुरांची आवश्यकता असल्याने त्यांनी धुळे जिल्ह्यातील प्रकाश राठोड या मुकादमाशी संपर्क साधला होता. Daund Fraud News

दोघांमध्ये 7 कोयते (१४ मजूर) पुरवण्याचा करार झाला होता. यासाठी मुकादम राठोड याने ‘मजुरांना आगाऊ पैसे द्यायचे आहेत’ असे सांगून लंबाते यांचा विश्वास संपादन केला. १३ ऑगस्ट २०२५ रोजी फिर्यादीने आपल्या मुलाच्या खात्यावरून मुकादमाच्या खात्यावर सुरुवातीला २ लाख 75 हजार रुपये पाठवले. त्यानंतर फोन-पे आणि बँकेद्वारे वेळोवेळी २० हजार, ५० हजार आणि १ लाख अशी रक्कम पाठवण्यात आली. Daund Fraud News

 

तसेच ८ सप्टेंबर २०२५ रोजी करार करताना तीन लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. अशा प्रकारे लंबाते यांनी एकूण 7 लाख 45 रुपये मुकादमाला दिले होते. साखर कारखाना सुरू झाल्यानंतर लंबाते यांनी मुकादम राठोड याला मजुरांबाबत विचारणा केली असता, त्याने “आज पाठवतो, उद्या पाठवतो” अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली. काही दिवसांनी त्याने लंबाते यांचे फोन उचलणेही बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजिनाथ लंबाते यांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. Daund Fraud News

दरम्यान, दौंड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुकादम हजारी राठोड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदारम्हेत्रे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. Daund Fraud News

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp