Pune News : पुणे : महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, भाज्या, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्याने जनता त्रस्त आहे, केंद्रातील सरकारला सामान्यांच्या प्रश्नांशी देणे घेणे नाही, अशा सरकारला जनतेने अद्दल घडवावी असे आवाहन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सवात नऊ महिलांना शक्तिपीठ जीवनगौरव पुरस्कार
पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना नवरात्र महोत्सवामध्ये नऊ महिलांना शक्तिपीठ जीवनगौरव पुरस्कार व दोन महिलांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. (Pune News) यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे पाटील, माजी उपमहापौर निलेश मगर हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रवीण तुपे, हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे, महिला अध्यक्षा वंदना मोडक, पल्लवी सुरसे, प्रशांत सुरसे, कार्याध्यक्ष सविता मोरे, दुर्योधन कामठे, प्रदीप गाडेकर यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खोतीदार व्यापाऱ्यांवर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांनी अन्याय केला असून, पारंपरिक व्यवसाय बंद केले असल्याने खोतीदारांच्या रोजीरोटींचा प्रश्न निर्माण झाला आहे हार्दिक प्रश्न सोडवावा अशी मागणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भिसे यांनी खा.सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
दरम्यान, हडपसर वाहतूक पोलीस निरीक्षक उल्हास कदम व काला दिग्दर्शक संदीप इनामके यांचा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. (Pune News) यावेळी मंडळाच्या वतीने “शक्तीपीठ जीवनगौरव पुरस्कार’ नलिनी भारत राऊत, केवल दत्तू शिंदे, भारती रमेश तुपे, परवीन महिबुब शेख, गायत्री पवार, रुपाली शेवाळे, माधुरी टिळेकर, करुणा दादासाहेब बरडे, लक्ष्मीबाई बबन भगत, यासाह विशेष पुरस्कार निकिता खडसरे टकले, पूनम मोरे यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन शैलेश नवले, प्रीतम बडदे, प्रवीण टिळेकर, राजाभाऊ डांगमाळी यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब भिसे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी तर आभार हेमंत ढमढेरे यांनी मानले.