Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक घटना…! दौंडमध्ये अडीच महिन्याच्या बाळावर बिबट्याचा हल्ला; मानेचा चावा घेतल्याने मृत्यू, परिसर हळहळला

गणेश सूळby गणेश सूळ
Sunday, 17 November 2024, 19:34
Leopard caught by forest officer in rahu daund Pune

गणेश सुळ / केडगाव : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील 4 वर्षाच्या मुलाला बिबट्यानं उसाच्या शेतात फरफटत नेत शरीरापासुन धड वेगळे केल्याची घटना ताजी असतानाच आता दौंड तालुक्यातील बोरीपार्धी हद्दीत अडीच महिन्याच्या बालकावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने बाळाच्या मानेचा चावा घेतल्याने प्रचंड रक्तस्राव झाला. तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि १७) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

 

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी कि, उसाची झोळी करून चिमुकल्याला आईने झोपवले होते. आई-वडील जवळच शेतात ऊसतोड करत होते. सदर कुटुंब करण दिलीप गायकवाड (मुळगाव, शिदवाडी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ) सध्या (रा. केडगाव टोल नाका, ता. दौंड, जि. पुणे) हे ऊस गुऱ्हाळावर तोडीसाठी गेल्या पाच वर्षापासून काम करत आहेत.

ऊसतोड (सरगरमळा) बोरीपार्धी येथील बाळासो भागुजी टेंगले यांच्या शेतात सुरु होती. पूर्ण परिसरात ऊस शेती असल्यामुळे शेतात बिबट्या लपल्याचे या मजुरांना समजले नव्हते. त्याच्या भोवती खेळत असलेल्या चिमुकलीने आरडाओरडा केल्यानंतर तिच्यावर होणारा हल्ला टळून तो अडीच महिन्याच्या चिमुरड्यावर झाला. हल्ला झाल्यावर परिसरातील लोकांनी आरडाओरडा केला. बिबट्याने त्या चिमुकल्याला तेथेच सोडून उसात पळ काढला.

ही हृदयद्रावक घटना पाहून गरीब शेतमजूर आई-वडिलांनी हंबरडा फोडत होते. पाहणाऱ्याचे डोळे ओलावले होते. ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल वाय. के. वीर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. केडगाव बोरीपार्धी हा प्रचंड लोकवस्ती असलेला परिसर आहे. इथे हल्ला झाल्याने नागरिक हवालदिल आहे. बिबटयाच्या मानवी हल्ल्यात मृत्युमुखी पडण्याची दौंड तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे.

गेल्या दोन दिवसापूर्वी शिरूर तालुक्यातील मांडवगण येथे एका चिमुकल्यावर हल्ला झाला होता. जनावरांवर हल्ल्यांचे तर नियमित झाले आहेत. मात्र मानवावर होणाऱ्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केडगाव, बोरीपार्धी व दौंड तालुक्यातील सर्वच ग्रामस्थांनी वनविभागाला कळवले होते. मात्र वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून येते. गेल्या तीन महिन्यात एकही बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले नाही. त्यामुळे बिबट्याचा फैलाव वाढतच चालला आहे.

शेखर सोडनवर – सदस्य ग्रामपंचायत बोरीपार्थी

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Crime

Crime : “मदतीला याल तर याद राखा…” प्रत्यक्षदर्शीला धमकावत काढलं शस्त्र अन तरुणीची भरदिवसा गळा चिरून आरोपी फरार

Thursday, 9 April 2026, 16:38

सावधान! सतत लॅपटॉप वापरताय? तुम्हालाही होऊ शकतो ‘लेझी आय’चा त्रास; जाणून घ्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

Thursday, 9 April 2026, 16:05

डॉक्टर पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट; मोबाईलमधील एका ‘चॅट’ने उघड केले धक्कादायक वास्तव

Thursday, 9 April 2026, 16:00

सोनं खरेदीची सुवर्णसंधी? अमेरिका-इराण तणाव निवळताच दरामध्ये मोठी घसरण

Thursday, 9 April 2026, 15:59

हुबेहूब अजितदादा! चष्मा, तेच गुलाबी जॅकेट…! अजितदादांसारखा लूक करत पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

Thursday, 9 April 2026, 15:51
Next Post

पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फक्त घोषणा; शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.