Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथे रेशनिंग कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने तिघांनी ज्येष्ठ महिलेला लुटले ; महात्मा गांधी रस्त्यावरील घटना

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 17 November 2024, 18:59

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील वयोवृद्‌ध महिला सायंकाळी पायी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या असता, तीन भामट्यांनी त्यांना हेरले आणि तुम्हाला रेशनिंग कार्ड काढायचे आहे का? फुकटचे रेशनिंग व पाच हजार रुपये सुद्धा मिळणार आहे. असे म्हणून संशयित भामट्यांनी हातचलाखीने आजीच्या गळ्यातील व कानातील सुमारे 50 ते 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. साखरबाई नवनाथ बदर (वय-60, रा. चक्रधर ज्वेलर्स मागे एम .जी. रोड उरुळी कांचन, ता. हवेली) असं वयोवृद्‌ध महिलेचे नाव आहे.

 

दरम्यान, या घटनेबाबत अद्यापही उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, अशी माहिती मिळत आहे. हा प्रकार शनिवारी (ता. 16) सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास चक्रधर कॉम्प्लेक्सच्या समोर असलेल्या कृष्ण मंदिराच्या बाहेर बाकावर घडला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वयोवृद्‌ध आजी साखरबाई बदर या महात्मा गांधी रस्त्यावरील चक्रधर कॉम्प्लेक्सच्या मागे राहतात. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्याठिकाणी एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा आला आणि त्यांना म्हणाला आजी तुम्हाला रेशनिंग कार्ड काढायचे आहे का? फुकटचे रेशनिंग मिळणार आहे. पाच हजार रुपये सुद्धा मिळणार आहेत.

महात्मा गांधी रस्त्यावरील कृष्ण मंदिराच्या बाहेर बाकावर दोन साहेब बसले आहेत, ते काढून देतायेत चला मी तुम्हाला दाखवतो. आम्ही पण काढले आहे. अशी माहिती सदर 13 ते 14 वर्षाच्या मुलाने आजीला दिली. त्यामुळे आजी त्याच्यासोबत गेल्या. कृष्ण मंदिराच्या बाहेर बाकावर दोन व्यक्ती बसलेली होती. यावेळी त्या ठिकाणावरून तो मुलगा निघून गेला. ती दोघे म्हणाली की आजी बसा हे दोनशे रुपये घ्या. तुम्हाला आणि तुमच्या गळ्यातले आणि कानातले काढून पाकिटात ठेवा व साहेबांची चेकिंग झाल्यानंतर मग घाला, त्यानंतर एक साहेब आपल्याला हे काम करून देणार आहेत.

यावेळी त्या आजीनी गळ्यातील व कानातील काढून दिले. व ते दोघेजण साहेबांना बोलावून आणतो, असे म्हणून निघून गेली. आजींना काहीच समजले नाही. आजीने अर्धा तास वाट पाहिली कोणीच आले नाही. आजी अर्धा तास थांबल्या आणि कुणीच न आल्यामुळे त्या घरी आल्या पिशवी उघडून बघतात तर त्यांचे पाकीटही नाही आणि त्या पाकिटमध्ये आधार कार्ड होते, त्या लोकांनी दिलेले दोनशे रुपये होते. आजीच्या गळ्यातले आणि कानातले असे जवळजवळ अर्धा पाऊण तोळ्याचा ऐवज होता ते घेऊन आरोपी पसार झाले.

दरम्यान, आजीने नंतर पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली. यावेळी पोलिसांनी येऊन पाहणी केली. पोलीस तपास चालू आहे, पण असे अजून कोणाच्या बाबतीत घडले आहे का? किंवा असे घडू नये म्हणून सावधानता बाळगावी. कोणाच्या बाबतीत हा प्रकार घडू नये म्हणून सर्व अशिक्षित गरीब नागरिकांनी सावध राहावे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस कशा प्रकारे तपास करून आरोपींना पकडतात. याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post
Leopard caught by forest officer in rahu daund Pune

हृदयद्रावक घटना...! दौंडमध्ये अडीच महिन्याच्या बाळावर बिबट्याचा हल्ला; मानेचा चावा घेतल्याने मृत्यू, परिसर हळहळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.