Pune News : सणसवाडी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलनाचे लोण पसरले असून, कुठे गाडयांची जाळपोळ, कुठे बसची तोडफोफ तर कुठे राजकीय नेत्यांच्या कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. काही ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. पुणे जिल्ह्यात मशाल रॅली, कँडल मार्च काढण्यात येत आहेत. त्यामुळे एकूणच राज्यभरात मराठा आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळत असून, सरकारने मराठा आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी केली जात आहे.
आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील
सणसवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून साखळी उपोषण, बाजारपेठ बंद ठेवत दैनंदिन व्यवहार बंद केले. तर शांततेच्या मार्गाने कॅण्डल मार्च काढत आंदोलन करण्यात आले. (Pune News ) सणसवाडीमध्ये मराठा आंदोलनाची धग कायम असून, गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरु करण्यात येत आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी गावातील ग्रामपंचायत ते ग्रामदैवत कालभैरव मंदिरापर्यत मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी कॅण्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. गावातील लहान मुले तसेच महिलांनीही या मार्चमध्ये सहभाग घेतला. (Pune News ) या वेळी ‘एक मराठा.. लाख मराठा….’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय…’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे…’ अशी सरकार विरोधात घोषणाबाजी करून कॅण्डल मार्च काढण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लवकरच ई-रिक्षा सेवा; प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय
Pune News : वाघोलीतील लॉजमध्ये प्रेमी युगूलाची आत्महत्या
Pune News : रिक्षात विसरली दिवाळी खरेदीची बॅग; फरासखाना पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन केली परत