Pune News : पुणे, ता. १० : “समाजात ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवी मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने जेष्ठ नागरिकांचे ज्ञान, अनुभव, तसेच हाताशी उपलब्ध असणारा वेळ यांचा योग्य मेळ घातल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आपण अनेक भरीव विधायक कार्ये समाजासाठी करू शकतो.” असे मत उच्च शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे आयोजन
जनसेवा फाऊंडेशन पुणे, सामाजिक न्याय आणि अधिकारिता – केंद्र शासन, राष्ट्रीय हेल्पलाइन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता – महाराष्ट्र शासन जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष पुणे महानगरपालिका लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना प्रांत ३२३४ डी २, NRIPO, पुणे आय एल सी (आय) पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, भारतीय योग संस्था पुणे, फेस्कॉम -पुणे व महाराष्ट्र, अस्कॉप-पुणे शहर, मुकुल माधव फाऊंडेशन, मधुर भाव फाउंडेशन, आस्क पुणे, विविध ज्येष्ठ नागरिक संघटना, नवचैतन्य हास्ययोग परिवार, एकता योग ट्रस्ट, हेल्प एज इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित जेष्ठ नागरिक आनंद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दौलत सागरजी महाराज (वय१०३), कोहिनूर समुहाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रविंद्र वंजारवाडकर, देविचंद जैन, अखिल भारतीय जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वासराव भदाने, आयकॉनचे उपाध्यक्ष आण्णासाहेब टेकाळे, पुणे शहराचे माजी महापौर अंकुश काकडे, माजी आमदार मोहन जोशी, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, कैलास पटेल, जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ विनोद शहा, जयदेव नायक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते केरबा निवांगुणे वय – १०५, रमेश पटवर्धन वय- १०२, गोरखे गुरुजी – वय १०२),
श्रीमती सुधा सबनीस (१०२) रेखा पेठे यांना शतायुषी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच समाजभूषण विजयकांत कोठारी, लीलाताई जोशी, ज्योती सचदे, अशोक परांजपे, यांना जेष्ठ नागरिक सन्मान पुरस्कार देण्यात आला, डाह्याभाई शहा आणि कांचनबेन शहा या दांपत्याला आदर्श पती-पत्नी पुरस्काराने सन्मानित केले. डॉ संपत पुंगलिया, शिवानी पुंगलिया यांचा आदर्श कुटुंब पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जनसेवा फाऊंडेशन पी. के. श्रॉफ जीवनगौरव पुरस्कार कांचन श्रॉफ यांच्या उपस्थितीत मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रा. विश्वासराव भदाने पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी अविनाश लकारे लिखित वार्धक्य शारजाचा अभ्यास या पुस्तकाचे व विजय देशमुख लिखित अर्थक्रांती जीवन गौरव अभियान पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “समाजाच्या जडणघडणीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे; पण सध्यस्थितीत समाज व कुटुंब हे ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते, कारण समाजात वृद्धाश्रम व निराधार आश्रमांची संख्या वाढतच आहे, हे भयानक आहे. आजचा तरुण उद्याचा प्रौढ तर परवाचा ज्येष्ठ नागरिक बनतो. आपला वृद्धापकाळ सुखा समाधानात जायचा असेल तर आपण आपल्या घरातील, समाजातील वृद्धांची काळजी घेतली पाहिजे व त्यांचा मानसन्मान राखला पाहिजे. शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत या योजनांचा ज्येष्ठांनी लाभ घ्यावा आणि आपलं जीवन सुखी ठेवावे अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.”
यावेळी रविंद्र वंजारवाडकर, विराज सागरजी महाराज, डॉ विनोद शहा म्हणाले डॉ विद्याधर वाटवे, ललित वालेचा, उदय कुलकर्णी, सचिन बन्सल यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.
दरम्यान, राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाचे सहसचिव डिंबळे यांनी जेष्ठांसाठी राज्यशासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
समारोप सञात धनश्री लेले यांनी आनंदी वृद्धत्वा विषयी मार्गदर्शनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. पी. देसाई, दिलीप पवार, अरूण रोडे, प्राचार्य एस. आर. पाटील, मोहन खटावकर, गायत्री जाधव, डॉ. शर्वरी शुक्ला यांनी केले.
जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प प्रमुख मिना शहा, राजेश शहा यांनी आभार मानले.