Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कल्याणीनगर अपघात प्रकरण : अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे; सिंगच्या पोलीस कोठडीत वाढ

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 15 November 2024, 9:34

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरण राज्यात नाही तर देशात गाजलं होतं. याबाबत खुलासे समोर येत आहेत. आलिशान ‘पोर्श’ मोटारमध्ये मागे बसलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयात शरण आलेला आरोपी अरुणकुमार सिंग याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे आता तपासातून समोर आले आहे. तर, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल यांनी साक्षीदारांच्या मार्फत दिलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये हस्तगत करण्यात येत आहे.

रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अखेर अरुणकुमार देवनाथ सिंग (वय ४७, रा. विमाननगर)हा शरण आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने सिंग याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सिंग याने वापरलेला आयफोन पंचनाम्यासाठी जप्त करण्यात आलेला आहे. तो सायबर तज्ज्ञांकडे देण्यात आला आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधून पैसे पाठविण्यात आले त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती या गुन्ह्याचा तपास करत असलेले सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी गुरुवारी न्यायालयामध्ये दिली.

सिंगच्या पोलीस कोठडीत १८ नोव्हेंबरपर्यंत वाढ..

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आलेले आहेत. मित्तल याने अल्पवयीन मुलाच्या ऐवजी स्वतःच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी केलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत त्याच्या बँक खात्याबाबत आरोपीकडे सखोल तपास करावयाचा आहे. सिंग हा ससून रुग्णालयात आल्यानंतर तो आणखी कोणाकोणाच्या संर्पकात होता? तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अटक आरोपी यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला सांगितले होते का? याबाबत सिंगकडे चौकशी करण्यात येत आहे. या गुन्ह्यात आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का? याबाबत तपास करण्यात येत आहे.

तसेच मोटारचालक अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि आई शिवानी अगरवाल यांनी साक्षीदारांच्या मार्फत दिलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये अद्यापही हस्तगत करण्यात आलेले नाहीत. त्याबाबत सिंग याच्याकडे तपास करायचा असून त्यामुळे त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सिंग याच्या कोठडीत १८ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जन्मदात्यानेच केला पोटच्या लेकीवर अमानुष अत्याचार! अंगावरचे कपडे काढून थंड पाणी ओतलं, सिगारेटचे चटके देत केसं कापले अन्…

Monday, 26 October 2026, 17:09

तरुण PMP बसमध्ये चढला, तिकीट दाखवलं अन् कंडक्टरला संशय येताच…पुण्यात ७० रुपये वाचवण्यासाठी पदवीधराचा प्रताप

Monday, 26 October 2026, 16:57

डॉक्टर की नराधम! महिलांना गुंगीचं औषध देऊन अत्याचार; व्हिडीओ व्हायरल केल्याचा प्रकार, भाजप पदाधिकाऱ्यालाही अटक, नेमकं प्रकरण काय?

Monday, 26 October 2026, 16:49

वाहनधारकांनो सावधान! आता HSRP नंबर प्लेट नसेल तर थेट होणार कारवाई; प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम सुरु

Monday, 26 October 2026, 16:06

पुण्यात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना! जुन्नरमध्ये वीजपंपाचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू; परिसरात हळहळ

Monday, 26 October 2026, 16:04

चक्रीवादळाचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात 140 किमी वेगाने वाहणार वारे अन् मोठं संकट; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? वाचा

Monday, 26 October 2026, 15:54
Next Post

Vivo चा 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच; 5000mAh बॅटरीसह आहेत अनेक बेस्ट फीचर्स, किंमतही कमी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp