उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बायफचे सेवानिवृत्त माजी अधिकारी मानसिंग गुलाब कड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष राजाराम भंडारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया कोरेगाव मूळ येथील ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. 09) सरपंच भानुदास जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी मानसिंग कड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी माजी सरपंच मंगेश कानकाटे, विठ्ठल शितोळे, उपसरपंच पल्लवी नाझिरकर, सदस्य बापुसाहेब बोधे, दत्तात्रय काकडे, राधिका काकडे, अश्विनी कड, लिलावती बोधे, मनिषा कड, वैशाली सावंत, ग्रामविकास अधिकारी स्वाती राजगुरु, पोलिस पाटिल वर्षा कड, पोपट कड, सोपान शितोळे, भास्कर कड, दिलीप शितोळे, अजय सावंत, मच्छिंद्र कड, आप्पा कड, मल्हारी कड, नितीन कड, बाळासो कड, बाजीराव कड, चिंतामणी कड, अमित सावंत, राजेंद्र कड आदी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दरम्यान, गावात योग्य समन्वयक कसा साधला जाईल यावर भर दिला जाईल.तसेच सर्वांच्या सहकार्याने खुप मोठी जबाबदारी मिळाली त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्ष मानसिंग कड यांनी व्यक्त केले.