लोणीकंद : माझ्याशी पुढील काही दिवस संपर्क साधू नका असे व्हाट्सअप स्टेटस ठेऊन पुणे शहर पोलीस दलाच्या लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) कालपासून बेपत्ता झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता. 26) दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे.
राहुल खंडू कोळपे (वय – 35) असे बेपत्ता अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या बेपत्ता होण्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीतीनुसार, राहुल कोळपे हे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाण्यात राहुल कोळपे हे 09 जुलै २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. काल शुक्रवारी नमाज पठन बंदोबस्त केला. व दुपारी जेवण करून येतो असे म्हणून घरी गेले. दुपारी घरी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून व्हाटसअपला सस्टेटसला ठेवले की, मला येथून पुढील काही दिवस फोन करू नका, एस.एम.एस करू नका तसेच कोणीही संपर्क करू नका असे स्टेट्स ठेवले व मोबाईल बंद केला.
यावेळी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी फोनवारून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मत्र तोपर्यंत कोळपे वापरत असलेले दोन्ही मोबाईल बंद लागले. याबाबत घरी फोन करून माहिती घेतली असता दोन्ही मोबाईल घरी असून साहेब बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, राहुल कोळपे यांच्या घरी पत्नी, 3 वर्षाची लहान मुलगी व एक लहान 3 महिन्यांचा मुलगा आहे. कोणाला कोळपे यांच्याविषयी काही माहिती असल्यास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर ९८२१५३७३१४, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे ९०४९९८१२२१, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे ८०८२०७७१००, लोणीकंद पोलीस ठाणे ९५२७०६९१००, या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.