मुंबई: महाराष्ट्राच्या राज्य शिक्षण मंडळाकडून १९ मे पासून प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केली जाईल. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि छत्रपती संभाजी नगरसह ८ विभागीय मंडळांमधील २०.४३ लाख विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विद्यार्थी १० कनिष्ठ महाविद्यालये निवडू शकतात आणि व्यवस्थापन कोटा किंवा अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत अर्ज करू शकतात. पहिली गुणवत्ता यादी ३ जून रोजी जाहीर होणार असून 5 जून रोजी Zero Round of Seat Allocation होईल. तसेच 28 मे पर्यंत ही प्रक्रिया खुली राहणार आहे. कागदपत्रे 6-12 जून दरम्यान अपलोड करायचे असून रिक्त जागांची यादी 14 जून रोजी प्रसिद्ध होईल.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. विद्यार्थी आणि पालकांना पोर्टलवर दिलेल्या वेळापत्रक आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया आज पासून सुरु झाली आहे, ज्यामध्ये विज्ञान शाखेसाठी ८.५२ लाख, वाणिज्य शाखेसाठी ५.४० लाख आणि कला शाखेसाठी ६.५० लाख जागा उपलब्ध आहेत.







