Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 November 2026, 19:32

पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले अर्थात फर्ग्युसन रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याचा मुद्दा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गाजला. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली. आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण विभागाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर शिवाजीनगरमधील गोखले रस्त्यावर अनधिकृत हॉटेल, कपड्यांची दुकाने, पक्की बांधकामे आणि अन्य अतिक्रमणांवर जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात आली.

दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आयुक्त नवल किशोर राम स्वतः कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्या देखरेखीखाली सुमारे २४ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईत अनधिकृत दुकाने, हातगाड्या, पथारी आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले.

महापालिकेची कारवाई सुरू झाल्यानंतर काही व्यावसायिकांनी विक्रीचे साहित्य इतर दुकानांमधील खोल्यांमध्ये लपवून ठेवले. मात्र, आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी संबंधित खोलीलाच टाळे ठोकण्याचे निर्देश दिले. आयुक्त स्वतः रस्त्यावर उतरल्याने कारवाईला वेग आला. कारवाईची माहिती मिळताच अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर येणे टाळले. परिणामी, मंगळवारी सायंकाळी या रस्त्यावरील पदपथांवरून नागरिकांना तुलनेने मोकळेपणाने चालता येत असल्याचे चित्र दिसले.

महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक्रमणविरोधी कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण सभेत अतिक्रमणांवर कारवाईची मागणी करणाऱ्या एका नगरसेवकाने आणि त्यांच्या नातेवाईकांनीच काही काळ या कारवाईला विरोध केल्याचा दावा केला जात आहे. अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार करून कारवाई थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आल्याचेही सांगितले जाते. अतिरिक्त आयुक्तांनी कारवाई थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन केल्याची चर्चा आहे. ही बाब आयुक्त नवल किशोर राम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी स्वतः रस्त्यावर उपस्थित राहून कारवाईची देखरेख केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, महापालिकेची कारवाई सुरू असली तरी तिच्या वेळेबाबत स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दुपारच्या वेळी कारवाई केल्यानंतर सायंकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणावर पथारी व्यावसायिक रस्त्यावर येतात. महापालिकेचे पथक आल्यावर विक्रेते साहित्य घेऊन निघून जातात आणि कारवाई संपल्यानंतर पुन्हा व्यवसाय सुरू करतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शनिवार आणि रविवारी या रस्त्यावर मोठी गर्दी असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळेसह शनिवार-रविवारीही अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. केवळ काही तास कारवाई करून अतिक्रमणांचा प्रश्न सुटणार नाही; त्यासाठी सातत्याने आणि प्रभावीपणे कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

Wednesday, 18 November 2026, 19:30

पुण्यात भरवस्तीत संशियितरित्या फिरत होते दोघे; पोलिसांनी विचारपूस करत झडती घेताच असं काही सापडलं की…

Wednesday, 18 November 2026, 19:16

नागरिकांच्या मागणीनंतर आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात!

Wednesday, 18 November 2026, 19:03

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27
Next Post

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp