Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 18 November 2026, 19:30

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांची मागणी असलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘चैत्यभूमी’ करण्यास राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर स्थानकाच्या नामांतराची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या व्यवस्थांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे आणि मुंबई महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करण्याच्या मागणीला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी विधिमंडळाच्या समितीबाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी विधिमंडळ अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेता उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि मागील वर्षांतील अनुभवातून समोर आलेल्या त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

महापालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, रेल्वे आणि इतर संबंधित यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, असेही त्यांनी नमूद केले. समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांच्या सहकार्याने महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन अधिक चांगल्या पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये आणि अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांवर अधिकृतपणे बंदी घालण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. परिसरातील शांतता, शिस्त आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी पोलीस व प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांच्या प्रवासासाठी वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा, पुढील प्रवासासाठी पर्यायी सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचणी आहेत, याची तपासणी करून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य आणि पावित्र्य कायम राखणे आवश्यक असल्याचे सांगत या दिवशी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. हा दिवस दुःखाचा आणि बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्याचा असल्याने उत्सवी कार्यक्रमांऐवजी अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट किंवा त्यांच्या विचारांशी सुसंगत उपक्रम आयोजित करता येतील का, याचा विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32

दादर स्थानक आता ‘चैत्यभूमी’ नावाने ओळखले जाणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; कोट्यवधी अनुयायांची मागणी होणार पूर्ण

Wednesday, 18 November 2026, 19:30

पुण्यात भरवस्तीत संशियितरित्या फिरत होते दोघे; पोलिसांनी विचारपूस करत झडती घेताच असं काही सापडलं की…

Wednesday, 18 November 2026, 19:16

नागरिकांच्या मागणीनंतर आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात!

Wednesday, 18 November 2026, 19:03

शायना एनसींच्या कृतीने वाद पेटला! बाळासाहेबांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री शिंदें मैदानात, शिवसैनिकांना स्पष्ट सांगितले…

Wednesday, 18 November 2026, 18:27

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांसाठी ४९ लाखांची मदत; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

Wednesday, 18 November 2026, 18:09
Next Post

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp