लोणी काळभोर, (पुणे) : Loni kalbhor News – गुढीपाडव्याचे औचित्य साधून लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni kalbhor) येथील तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे (Ramdara Shivalaya) वतीने बुधवारी (ता. २२) शोभायात्रेचे आयोजन (A procession is organized through)करण्यात आले. यावेळी धनगर समाजाने (pilgrimage site) सादर केलेले गजनृत्य सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. (Loni kalbhor)
पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढली
रामदरा येथील सर्व मंदिरातील देवतांचे मुकुट सोन्याचांदीच्या दागिण्यांसमवेत रामदरा शिवालयाचे शिल्पकार स्वर्गीय १००८ श्री देवीपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा व त्यांचे शिष्य मंगलपूरी महाराज यांच्या पादुकांची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धुंदीबाबा यांचे उत्तराधिकारी हेमंतपूरी महाराज उपस्थित होते.
तरवडी, रानमळा व केसकरवस्ती येथील धनगर समाजाने सादर केलेले गजनृत्य व सोलापूर जिल्ह्यातील निमगांव पाटी (विझोरी) येथील श्री राम हलगी ग्रुपने केलेले वादनामुळे मिरवणूकीत रंगत आली. फटाक्यांची आतिशबाजी, गुलालाची मुक्त उधळण व ढोलाच्या तालावर अबालवृध्दांचा पडत असलेला पदन्यास पाहण्यासाठी लोणी काळभोर गावांत नागरिकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, चौकाचौकांत या शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आज रामनवमीसाठी लागणा-या भंडा-याचे व इतर पूजा साहित्याची खरेदी करण्यात आली. तसेच आजपासून रामनवमी पर्यंत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावर्षी तिर्थक्षेत्र रामदरा येथे रामनवमी निमित्ताने मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्याने सर्व नियोजन केल्याची माहिती १००८ श्री हेमंतपूरी महाराज यांनी दिली.