Pune Crime | पुणे : पुणे शहरात मार्फींगच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसून येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार शहरातील विश्रामबाग परिसरातून समोर आला आहे. पतीनेच आपली सासू व तिच्या मित्रांचे फोटो मार्फ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime) चेहरे वापरून नग्न फोटो तयार करत ते नातेवाईकांना पाठवत विनयभंग केला.
विश्रामबाग परिसरातील घटना…
याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.(Pune Crime) त्यावरून पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च ते १८ मे २०२३ दरम्यान घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीने मोबाईलवर सासू व त्यांच्या मित्रांचे फोटो मार्फ केले. (Pune Crime) यांचे चेहरे वापरुन नग्न फोटो तयार केले. व ते फोटो नातेवाईकांना पाठवले. (Pune Crime) तक्रारदार यांच्या आत्याच्या मोबाईलवर पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल,असे कृत्य केले. आरोपी व तक्रारदार महिला हे वेगळे राहतात. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : खळबळजनक! सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा
Pune Crime : जनरेटर चोरणाऱ्या तीन भामट्यास गुन्हे शाखेने केली अटक
Pune crime : शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात ; लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ