उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या भागातून गहाळ झालेले 1 लाख 80 हजार रुपयांचे 10 मोबाइल संच पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला आहे.
दशरथ नितिन खोले (रा बोरीऐंदी, ता.दौंड) दिपु उमेश विश्व (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली), मोहम्मद फजल शेख (रा. उरुळी कांचन ता. हवेली), केशव विश्वंभर भारती (रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली) गौरी संजय ताकवणे (रा. पारगाव ता. दौंड) नरेशकुमार फेकु शर्मा (रा. कोरेगाव मुळ) प्रशांत भरत गजरे (रा. तुपेवस्ती उरुळी कांचन) दत्तात्रय संग्राम मुंढे रा. उरुळी कांचन) अफरिन शब्बीर जमादार (रा. खेडेकर मळा, उरूळी कांचन) व अमोल लक्ष्मण शिंगाडे (रा. वाघापुर ता हवेली) या तक्रारदारांना मोबाईल परत करण्यात आले.
मोबाईल संच हरविल्यास त्याची प्रत या पोर्टलवरुन नागरिकांना उपलब्ध होते. मोबाईल संचाचा आयएमईआय क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येते. मोबाईल हरवल्याच्या तक्रारी उरुळी कांचन पोलिसाांकडे करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 1 लाख 80 हजार रुपये किमतीच्या 10 मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल खांडेकर, धनंजय भोसले, राजकुमार भिसे, यांच्या पथकाने तांत्रिक तपास करुन हरवलेल्या मोबाईल संचांचा शोध घेतला.