खेड (पुणे): पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकूण १०८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये खेड तालुक्यातील एकूण १८ गावांच्या सरपंच पदाचे आरक्षण ही जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे ही आरक्षण सोडत पार पडली होती. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास वर्ग, सर्वसाधारण या प्रवर्गासाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली होती. यामध्ये खेड तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतीचा समावेश होता.
ग्रामपंचायतीचे नाव आणि सरपंच पदाची आरक्षण यादी पुढील प्रमाणे:
खराबवाडी- सर्वसाधारण (महिला), जऊळके खुर्द-सर्वसाधारण, कोहिंडे बुद्रुक- सर्वसाधारण, सोळू- सर्वसाधारण, वडगाव घेनंद- नागरिकांचा मागास वर्ग, धामणे- सर्वसाधारण, गुळाणी- नागरिकांचा मागास वर्ग, रौंधळवाडी- नागरिकांचा मागास वर्ग (महिला), आसंखेड बुद्रुक- सर्वसाधारण (महिला), आंबेठाण-अनुसूचित जमाती, वाशेरे-सर्वसाधारण (महिला), सायगाव-नागरिकांचा मागास वर्ग, कडाचीवाडी-नागरिकांचा मागास वर्ग (महिला), बोरदरा-सर्वसाधारण (महिला), पाईट- नागरिकांचा मागास वर्ग, कोये- सर्वसाधारण (महिला), खालुंब्रे-अनुसूचित जमाती (महिला), टेकवडी-सर्वसाधारण (महिला).