पुणे: शहरातील येरवडा भागातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.शहरात पुन्हा एकदा कोयता गँगने डोके वर काढल्याचे समोर येत आहे. लुटमार, चोऱ्या, खुन, मारमारी यांसारख्या घटनेत वाढ होत असताना आता येरवड्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. येरवडा भागात श्रीकांत चव्हाण नावाच्या तरुणाला एका टोळक्याने कोयत्याने वर करत जबर मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तीन तरुणांकडून हातात कोयता घेऊन दहशत निर्मितीचा प्रयत्न
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये तीन तरुणांनी हातात कोयता घेऊन तसेच लाकडी बांबू हातात घेऊन गाड्यांची तोडफोड केली आहे. यामुळे येरवडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तोडफोड आणि मारहाण केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कोयता गँगवर तात्काळ कारवाईला सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. यावरून येरवडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. अश्या आरोपींमुळे येरवडा परिसरात नागरिक भीतीच्या वातावरणात आहेत. कित्येक कालावधीपासून कोयता गँगला पुणे पोलिसांकडून रोखण्यात अपयश येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.