तुळजापूर : राज्यभर चर्चेत असलेल्या तुळजापूर ड्रग्सप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. कारवाईत पोलिसांनी सुरुवातीला तिघांना अटक केली. संबंधित तिघांची चौकशी केली असता, या ड्रग्ज प्रकरणात तब्बल ३६ जणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. आता याच प्रकरणात पोलिसांनी भाजप नेत्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे.शरद जमदाडे असं अटक केलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे.

फेब्रुवारी महिन्यात तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. या संबंधित नेता मागील दीड महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आता अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. भाजप नेते शरद जमदाडे यांना अटक करण्यात आल्याने आता राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एकूण 36 आरोपींची नावं समोर आली होती. यातील 16 आरोपींना पकडण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलं आहे. अद्याप 20 आरोपी फरार आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, लवकर त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.








