बीड: बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे पेट्रोल पंपाजवळ एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला अज्ञात स्थळी घेऊन जाऊन लाठ्या आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवराज हनुमान दिवटे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिवराज याचे परळीतील पेट्रोल पंपाजवळून अपहरण करण्यात आले. त्यानंतर आरोपींनी त्याला लाठ्या आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी कडून करण्यात येत आहे.

तरुणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमत आरोपींनी पीडित तरुणाला लाठ्या आणि बेल्टने मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.







