पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड येथे तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यानुसार, आता अनेक रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड येथे लेखा लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 23 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 81100 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://cidco.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लेखा लिपिक.
– एकूण रिक्त पदे : 23 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– वेतन / मानधन : रु. 25,500/- ते रु. 81,100/- पर्यंत.
– शैक्षणिक पात्रता : बी.कॉम / बीबीए / बीएमएस.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 28 जानेवारी 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2025.







