Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 November 2026, 16:19

डॉ. अशोक बालगुडे

पुणे : जिभेला चव आणि शरीराला आजार देणाऱ्या जंक फूडच्या वाढत्या मोहाला आवर घालण्यासाठी इंडियन सायकलिंग क्लबच्या चार सदस्यांनी थेट सायकलचीच घंटी वाजवली! पिंपळे निलख येथील या क्लबच्या चार सायकलस्वारांनी पुणे ते शिर्डी असे 180 किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करीत सकस आहाराचा संदेश दिला. क्लबची ही नववी शिर्डीवारी ठरली. रस्त्यावर पेडल मारतानाच नारायणगाव आणि कोऱ्हाळे येथे नागरिकांशी संवाद साधून त्यांनी जंक फूडच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन केले.

आजच्या मुलांच्या हातात पुस्तकापेक्षा मोबाइल आणि डब्यात घरच्या पोळीपेक्षा जंक फूड अधिक दिसू लागले आहे. चवीच्या नादात आरोग्याची किंमत मोजण्याची वेळ येऊ नये, यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सायकलस्वार प्रा. सुनील अडसुळे यांनी सांगितले. जंक फूडचे दुष्परिणाम केवळ शरीरापुरते मर्यादित नसून मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहाटे सायकलची घंटी; चंदनापुरी घाटात खरी कसोटी!

शनिवारी (दि. 14) पहाटे 3.45 वाजता जगताप डेअरी येथून या सायकलवारीला सुरुवात झाली. राजगुरुनगर येथे पहिला थांबा घेतल्यानंतर सायकलस्वार नारायणगावला पोहोचले. तेथे अल्पोपहाराबरोबरच जनजागृतीचा कार्यक्रम झाला. पुढे आळेफाटा मार्गे माऊली येथील श्री साईबाबा मंदिरात त्यांनी विश्रांती घेतली.

माऊली ते संगमनेर हा टप्पा मात्र सायकलस्वारांची खरी परीक्षा पाहणारा ठरला. चढ, जोराचा वारा आणि वाढते ऊन यांच्याशी सामना करीत त्यांनी चंदनापुरीचा घाट पार केला. थकवा आला, तरी जिद्दीचा वेग कमी झाला नाही. संगमनेरजवळ भोजनाचा थांबा घेतल्यानंतर समनापूरमार्गे शिर्डीकडे कूच केले. कोऱ्हाळे येथे नागरिकांशी संवाद साधत सायंकाळी सहा वाजता त्यांनी शिर्डी गाठली.

‘श्रद्धा आणि सबुरी’चा प्रवासातही प्रत्यय

क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत ववले, संतोष दरेकर, संदीप बोडके आणि प्रा. सुनील अडसुळे या चौघांनी ही मोहीम पूर्ण केली. शिर्डीत श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ‘श्रद्धा आणि सबुरी’ या शिकवणीतून प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आशुतोष देसले, संजय टिळेकर आणि संतोष इंगवले यांनी प्रवासात आवश्यक मदत केली.

सायकलच्या पेडलवर सामाजिक प्रबोधन!

इंडियन सायकलिंग क्लबची ओळख केवळ सायकलवारीपुरती नाही. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘सायकल वापरा, प्रदूषण टाळा’ अशा विषयांवर क्लबने यापूर्वी जनजागृती केली आहे. पुणे–कन्याकुमारी, पुणे–गोवा, पुणे–अक्कलकोट, पुणे–त्र्यंबकेश्वर आणि अष्टविनायक अशा सायकलवाऱ्या क्लबने पूर्ण केल्या आहेत. पुणे–शिर्डीची ही नववी, तर पुणे–पंढरपूरची चौथी वारी ठरली.

सायकलचे पेडल फिरवताना सामाजिक परिवर्तनाचे चाकही फिरावे, हा क्लबचा प्रयत्न आहे. कारण जंक फूडच्या जाहिरातींना उत्तर देण्यासाठी केवळ उपदेश पुरेसा नाही; आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रत्यक्ष आदर्शही उभा करावा लागतो. या चार सायकलस्वारांनी 180 किलोमीटरचा प्रवास करून तोच आदर्श घालून दिला!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Tuesday, 17 November 2026, 17:36

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05
Next Post

रोहित पवारांचं 'मफलरवाला नेता' विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या "रोहितचं मन अस्वस्थ आहे...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp