Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 November 2026, 16:55

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवत व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा आणि रोहित पवार यांच्यात प्रेमाचे नाते होते. त्यामुळे रोहितचे मन अस्वस्थ असून त्याला अनेक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असे त्या म्हणाल्या.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्हीएसआर कंपनीचे संचालक रोहित सिंग यांच्या जयपूरमधील लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, असा दावा केला. या लग्नात मुख्यमंत्री सुमारे दीड तास थांबले होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवला.

मात्र, केवळ फोटो दाखवला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा घातपात केला, असे आपण म्हणत नसल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांचा अपघात ज्या विमान कंपनीच्या विमानामुळे झाला, त्या कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत असल्याचा संशय असल्याचा आरोप त्यांनी केला.

रोहित पवारांच्या आरोपांवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजितदादा आणि रोहित पवार यांच्यात प्रेमाचे नाते होते. त्यामुळे रोहितचे मन अस्वस्थ आहे. माझ्या काकांना नेमके काय झाले, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत आणि त्याला त्यांची उत्तरे अपेक्षित आहेत. हा प्रश्न केवळ रोहितच्याच नव्हे, तर अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे मला रोहितशी बोलावे लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याला शब्द दिला आहे. अजितदादांच्या अपघाताचा चौकशी अहवाल लवकरात लवकर यावा, अशी जाहीर मागणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर केली आहे. अमित शाह यांनीही या विषयाची दखल घेतली आहे. त्यामुळे आपण चौकशी अहवालाची वाट पाहू, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. “माझा भाऊ गेला आहे, हा आमच्या ब्रेकिंग न्यूजचा विषय नाही. सगळ्यांनीच संवेदनशील राहावे, अशी मी हात जोडून विनंती करते,” असे भावनिक आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी व्ही. के. सिंग आणि व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील एक नेता प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, संबंधित नेत्याकडे मुख्यमंत्री म्हणून सत्ता आहे, तसेच सीआयडी, पंतप्रधान आणि सीबीआयपर्यंत पोहोच आहे. तरीही तपासात अपेक्षित प्रगती का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“आम्ही आमच्या काकांना न्याय देऊ शकलो नाही, तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी काही गोष्टी समोर आणल्यामुळे आपले राजकीय नुकसान झाले तरी त्याची चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपण ज्या व्यक्तीचे नाव घेत आहोत, त्या व्यक्तीने अजितदादांचा घातपात केला, असे म्हणत नसून विमान कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात सुरुवातीला बारामती पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेथील पोलीस सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास तयार होते; मात्र नंतर कोणाचा तरी फोन आल्याने त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला, असा दावा रोहित पवार यांनी केला.

त्यानंतर कर्नाटकात जाऊन झीरो एफआयआर दाखल करण्यात आला. पुढे हा गुन्हा महाराष्ट्रात वर्ग होऊन सीआयडीकडे तपासासाठी देण्यात आला. मात्र, सीआयडीने त्याची नोंद गुन्हा म्हणून न करता जोडपत्र म्हणून स्वीकारल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

अजित पवार यांच्या दौऱ्यात आणि विमानाच्या वेळेत बदल झाल्याचा मुद्दाही रोहित पवार यांनी उपस्थित केला. अजितदादा सुरुवातीला गाडीने बारामतीला जाणार होते. मात्र, त्यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी फोन करून भेटायला येत असल्याचे सांगितले, असा दावा त्यांनी केला.

तसेच एका व्यक्तीने फाईलवर सही करायची असल्याचे सांगून अजितदादांना थांबवले, असेही रोहित पवार म्हणाले. या घडामोडींमुळे दादांचा दौरा पुढे गेला आणि त्यांना गाडीऐवजी विमानाने प्रवास करावा लागला. पक्षातील दोन नेत्यांमुळेच त्यांचा रस्तेप्रवास थांबला आणि विमानप्रवासाचा निर्णय झाला, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, रोहित पवार यांनी केलेले आरोप आणि संशय याबाबत संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा चौकशीचा अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे या आरोपांची स्वतंत्र पडताळणी आणि अधिकृत चौकशी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Tuesday, 17 November 2026, 17:36

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05
Next Post

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp