Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 November 2026, 17:05

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नेमके सत्य समोर यावे आणि या घटनेची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या अपघातामागील खरे कारण शोधून संपूर्ण माहिती देशाला आणि महाराष्ट्राला दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीरपणे दिला असल्याची आठवणही सुळे यांनी माध्यमांशी बोलताना करून दिली.

दुसरीकडे, या अपघाताबाबत जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी ॲड. नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्यांचे हे अर्ज फेटाळून लावले आहेत. नागरी विमान सुरक्षा ब्युरोनंतर आता मुंबई पोलिसांनीही फुटेज देण्यास स्पष्ट नकार दिल्याचा दावा ॲड. यादव यांनी केला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांनी दिलेले उत्तर आणि विमान सुरक्षा ब्युरोने प्रथम अपील फेटाळताना दिलेली कागदपत्रेही समोर आणली आहेत.

ॲड. यादव यांनी 28 जानेवारी 2026 रोजीच्या पहाटे 6 ते सकाळी 9 या कालावधीतील मुंबई विमानतळावरील चित्रीकरण मागितले होते. नागरी विमान वाहतूक विभागाने आणि नंतर ब्युरोने सर्वसामान्यांना हे फुटेज देता येणार नाही असे सांगत अपील नाकारले. यासोबतच, अजित पवार यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानापासून विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे फुटेज मिळावे, असा अर्ज मुंबई पोलिसांकडे करण्यात आला होता. ही माहिती सार्वजनिक हिताची नसून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणारी असल्याचे कारण देत पोलिसांनी ती नाकारली.

महत्त्वाचे म्हणजे, विमान सुरक्षा ब्युरोने हे फुटेज पोलिसांकडे सुपूर्द केल्याचे उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे चित्रीकरण उपलब्ध असूनही ते जनतेपासून का लपवले जात आहे, असा सवाल यादव यांनी विचारला आहे. अजित पवार हे राज्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आणि संविधानिक पदावर होते, त्यामुळे ही माहिती खासगी ठरवणे अयोग्य आहे. जर यामागे कोणताही घातपात नसेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने सर्व उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तात्काळ सार्वजनिक करून नागरिकांच्या मनातील शंकांचे निरसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39
Next Post

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp