Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 November 2026, 17:51

पुणे : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह या प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या सांगण्यावरून सातपुते यांनी पुण्यात असताना खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा ठोंबरे-पाटील यांनी केला आहे. तसेच चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचाही आरोप त्यांनी केला.

रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितले की, अशोक खरात प्रकरणातील एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची त्यांनी भेट घेतली होती. यावेळी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. मात्र, सातपुते यांनी शेवटपर्यंत चाकणकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही. दुसरीकडे, चाकणकर यांच्यावर टीका करणाऱ्यांविरोधात मात्र गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली झाल्यानंतर सात महिन्यांनी एक कथित खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आल्याचा दावाही ठोंबरे-पाटील यांनी केला.

तेजस्वी सातपुते यांच्या आतापर्यंतच्या बदल्या अशोक खरातच्या माध्यमातून, म्हणजेच स्वतःच्या माध्यमातून होत असल्याचे रुपाली चाकणकर सांगायच्या, असा दावा ठोंबरे-पाटील यांनी केला. खरातसोबत फोटो आहेत म्हणून चाकणकर यांच्यावर आरोप करत नसून, त्या खरातच्या ट्रस्टवर होत्या, या कारणावरून प्रश्न उपस्थित करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रुपाली चाकणकर, त्यांच्या बहिणी आणि कुटुंबीयांच्या नावावर पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप ठोंबरे-पाटील यांनी केला. अशोक खरातशी संबंधित अनेक आर्थिक प्रकरणांमध्ये चाकणकर यांच्या बहिणीचे नाव नॉमिनी म्हणून असल्याचा दावाही त्यांनी केला. असे असतानाही संबंधितांवर गुन्हे दाखल का झाले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रुपाली चाकणकर यांनी अनेक महिला आणि राजकीय नेत्यांना अशोक खरात याच्याकडे नेल्याचा आरोपही ठोंबरे-पाटील यांनी केला. खरातकडे गेलेल्या काही राजकारण्यांना आता धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. “मला वाचवा, नाहीतर तुमचे फोटो व्हायरल करेन,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तसेच, चाकणकर यांच्या सांगण्यावरून पोलिसांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांनी पत्रकार खेमनार यांना माफी मागण्यास भाग पाडले, असाही दावा ठोंबरे-पाटील यांनी केला. हे सर्व प्रकार पदाचा गैरवापर करून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Tuesday, 17 November 2026, 17:36

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

Tuesday, 17 November 2026, 16:55

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp