Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 November 2026, 17:36

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड (FC रोड) आणि गोखले रोड परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात पुणे महानगरपालिकेने अखेर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भागातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतली असून, पदपथ आणि रस्ते सर्वसामान्य पादचाऱ्यांसाठी मोकळे केले जात आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या तातडीच्या आदेशानंतर ही कारवाई वेगाने सुरू झाली आहे.

या कारवाईमागे पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेले जोरदार आंदोलन कारणीभूत ठरले आहे. या मुख्य रस्त्यांवरील बेशिस्तपणा आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजप नगरसेवक रवींद्र साळगावकर यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातात निषेधाचे फलक धरून प्रशासनाच्या कामकाजाविरोधात धरणे आंदोलन केले. या तीव्र विरोधामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते आणि काही काळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

आंदोलक नगरसेवकांनी या वेळी प्रशासनावर आणि फेरीवाल्यांवर अनेक गंभीर आरोप केले. एफसी रोड आणि गोखले रोडच्या पदपथांवर स्टॉलधारकांनी पूर्णपणे कब्जा केल्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही, अशी तक्रार त्यांनी केली. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, या परिसरातील काही फेरीवाल्यांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणी आणि महिलांची छेडछाड केली जाते, तसेच त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहून अश्लील शेरेबाजी केली जाते, असा संताप नगरसेवकांनी व्यक्त केला. या सर्व प्रकाराला महापालिकेच्या अधिकाऱ्यांचेच अभय असून, अधिकारी या विक्रेत्यांकडून नियमितपणे आर्थिक हप्ते उकळतात, असा थेट आरोपही सभागृहात करण्यात आला.

नगरसेवकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि वाढत्या दबावापुढे झुकत प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. त्यानंतर लगेचच अतिक्रमण विभागाची पथके संबंधित रस्त्यांवर दाखल झाली असून बेकायदेशीर बांधकामे व स्टॉल्सवर कारवाई करत आहेत. या मोहिमेमुळे सामान्य नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Tuesday, 17 November 2026, 17:36

अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास चर्चेत! महत्त्वाचे CCTV फुटेज देण्यास मुंबई पोलिसांची नकारघंटा..

Tuesday, 17 November 2026, 17:05

रोहित पवारांचं ‘मफलरवाला नेता’ विधान; सुप्रिया सुळेंनी डायरेक्ट हात जोडले, म्हणाल्या “रोहितचं मन अस्वस्थ आहे…

Tuesday, 17 November 2026, 16:55

जंक फूडला टांग; आरोग्यासाठी सायकलची ‘पांग’!पुणे ते शिर्डी 180 किलोमीटरचा प्रवास; सायकलस्वारांनी दिला सकस आहाराचा संदेश

Tuesday, 17 November 2026, 16:19

वाळू माफियांना शिरूर अन् श्रीगोंदा महसूल विभागाचा जोरदार दणका! आठ सेक्शन अन् नऊ फायबर बोटी जिलेटिनने फोडल्या; घोड धरणातील अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई!

Tuesday, 17 November 2026, 16:07
Next Post

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp