Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 November 2026, 17:39

सांगली : चिपळूण तालुक्यातील वालोपे परिसरात एका ३३ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवनाथ बबन कांबळे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या डोक्यावर जांभ्या दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वालोपे येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर झुलाई जनरल स्टोअर्सच्या मागील बाजूस त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चिपळूण पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

नवनाथ कांबळे हा मूळचा सांगली जिल्ह्यातील वांगी, तालुका खडेगाव येथील रहिवासी होता. तो चिपळूणमध्ये आपल्या बहिणीकडे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही.

मंगळवारी सकाळी वालोपे परिसरात रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांच्या डायल ११२ क्रमांकावर देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता एका व्यक्तीने मृत तरुणाच्या बहिणीच्या पतीला ओळखत असल्याचे सांगितले.

त्यानंतर बहिणीच्या पतीला घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवून हा आपला मेहुणा नवनाथ कांबळे असल्याचे सांगितले. नवनाथला दारू पिण्याचे व्यसन होते आणि तो मागील रात्रीपासून घराबाहेर गेला होता, अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांना घटनास्थळी नवनाथच्या डोक्याजवळ जांभा दगड आढळून आला आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून या दगडाने डोक्यावर वार केला असावा किंवा अन्य प्रकारे मारहाण केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गंभीर जखमी झाल्याने नवनाथचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅन, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण केले आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

 

 

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39
Next Post

"तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या..." रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp