Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 November 2026, 18:12

विशाल शिंदे

सांगवी बुद्रुक | कापूरहोळ : वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कसोडपत्रावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट निर्घृण खुनात झाल्याची धक्कादायक घटना भोर तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे घडली आहे. गावचे ५० वर्षीय पोलीस पाटील अशोक साधू येनपूरे यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. सोमवारी (दि. १६) सायंकाळी सहाच्या सुमारास गावच्या हद्दीतील लमनदेव मंदिराजवळ ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून गावासह आसपासच्या भागात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक येनपूरे हे सोमवारी सायंकाळी शेतातील काम आटोपून मोटारसायकलवरून घरी परतत होते. यावेळी लमनदेव मंदिराजवळील रस्त्यावर आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींच्या आई लीलाबाई यांच्या वडिलोपार्जित जमिनीचे हक्कसोडपत्र करून देण्यावरून अशोक येनपूरे यांच्याशी यापूर्वीपासून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. याच वादातून प्रतीक शेजवळ (रा. सांगवी बुद्रुक) आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी येनपूरे यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर, उजव्या कानावर आणि उजव्या हाताच्या दंडावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने अशोक येनपूरे यांचा मृत्यू झाला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी मृत अशोक येनपूरे यांचे पुत्र शुभम अशोक येनपूरे (वय २३) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक शेजवळ आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थांचा ठिय्या

घटनेनंतर अशोक येनपूरे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून राजगड पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला घेराव घालत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह येथून हलविणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांना लेखी आश्वासन दिले. अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करावी, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला. अशोक येनपूरे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आरोपींना अटक न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा

पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला असला, तरी आरोपींच्या अटकेबाबत ग्रामस्थांची भूमिका आक्रमक आहे. दिलेल्या मुदतीत आरोपींना अटक झाली नाही, तर पुणे-सातारा महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण भोर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

संपूर्ण परिसरात हळहळ; पोलिसांच्या तपासाकडे लक्ष

अशोक येनपूरे हे सर्वांशी मिळून-मिसळून वागणारे व्यक्तिमत्त्व असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे. एका जमिनीच्या वादातून गावातील जबाबदार व्यक्तीचा जीव जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करावी, घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी तपासावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39

पुण्यातील FC रोड अन् गोखले रोडवरील फेरीवाल्यांची खैर नाही! PMC ॲक्शन मोडमध्ये, अनधिकृत विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू!

Tuesday, 17 November 2026, 17:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp