Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 November 2026, 17:54

हडपसर, ता. 17 : ‘तू इथे कमवून खायला आलेला आहेस, तुला नीट राहायला येत नाही का?’ असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने वाहनचालक तरुणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यानंतर लोखंडी हत्याराने थेट छातीत वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मांजरी बुद्रुक येथील गोपाळपट्टी परिसरात घडली. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य तिघांविरुद्धही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थ बसवराज स्वामी (वय-27, रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर योग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना 15 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गोपाळपट्टी येथील शिवशाही हॉटेलजवळ घडली.

याप्रकरणी सिद्धार्थ स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभिषेक संतोष पात्रे (वय-22 ) आणि रोहन उत्तम मांढवे (वय-22, दोघेही रा. मांजरी) यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रवीण भारती, नीलेश कुतरवाडे आणि अखिलेश होनमाने (सर्व रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ स्वामी हे वाहनचालक म्हणून काम करतात. 15 नोव्हेंबर रोजी रात्री ते शिवशाही हॉटेल येथे गेले होते. हॉटेलजवळील पानटपरी परिसरात ते थांबले असताना पाचही आरोपी तेथे आले. स्वामी यांचा आरोपींशी कोणताही वाद नसताना आरोपींनी त्यांना ‘तू इथे कमवून खायला आलेला आहेस, तुला नीट राहायला येत नाही का?’ असे म्हणत शिवीगाळ केली.

त्यानंतर ‘तुला जिवंत सोडणार नाही, मारून टाकेन,’ अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रवीण भारती याने हातातील लोखंडी हत्याराने स्वामी यांच्या छातीत वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी हातातील हत्यारे हवेत फिरवत ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर खल्लास करू,’ अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम म्हेत्रे करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58

मांजरी येथे ‘तू इथे कमवायला आला आहेस, नीट राहता येत नाही का?’ म्हणत वाहनचालकाच्या छातीत वार; दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 17:54

“तेजस्वी सातपुतेंच्या बदल्या खरातच्या माध्यमातून व्हायच्या…” रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या आरोपाने खळबळ; राजकारण पुन्हा तापलं

Tuesday, 17 November 2026, 17:51

रात्री घरातून बाहेर पडला अन् दुसऱ्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात सापडला! सांगलीच्या तरुणाचा चिपळूणमध्ये निर्घृण खून; नेमकं काय घडलं?

Tuesday, 17 November 2026, 17:39
Next Post

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp