शिक्रापूर: घरात एका एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मांजरेवाडी (ता. शिरुर) येथे घडली. दत्तात्रय देवराम मांजरे (वय ५२ रा. मांजरेवाडी ता. शिरुर जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत कानिफनाथ देवराम मांजरे (वय ५० रा. मांजरेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
दत्तात्रय मांजरे हे घरात असताना त्यांची पत्नी सरस्वती बाहेर कपडे धूत होती. काही वेळाने सरस्वती ही कपडे सुकायला टाकण्यासाठी गेली असता दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे त्यांनी पाठीमागे जाऊन खिडकीतून पाहिले असता दत्तात्रय मांजरे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान नागरिकांनी त्यांना खाली घेत उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दत्तात्रय मांजरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड हे करत आहेत.