मुंबई: २००७ च्या ब्लॉकबस्टर ‘तारे जमीन पर’ चा सिक्वेल असलेला आमिर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सीतारे जमीन पर’ २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा आणि इतर १० नवीन चेहरे आहेत. चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूझा दिसणार आहे. ‘तारे जमीन पर’ मधील निकुंभ एक संवेदनशील व्यक्ती होती. या चित्रपटातील गुलशन हे पात्र अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हा चित्रपट अपंग लोकांभोवती असून त्यांच्या जीवनावर आधारित आहे. आमिर खान गुलशनची भूमिका साकारत आहे, जो बास्केटबॉल प्रशिक्षक आहे. हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाची भारतीय आवृत्ती आहे. या चित्रपट तुम्हाला रडवणार नसून हसवणार असल्याचे अमीरने सांगितले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर, चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.