Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 November 2026, 19:54

पुणे : पुणे शहरातील वाढते रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्मेट न वापरणारे दुचाकीस्वार, विरुद्ध दिशेने (राँग साईड) वाहन चालविणारे आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडील थकीत दंड वसूल करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी बंद करण्यात आलेली ई-चलान यंत्रणाही पुन्हा सुरू करण्याची तयारी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर’ प्रकल्पांतर्गत देशातील सर्वाधिक अपघात होणाऱ्या १०० जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात येत आहेत.

या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी माहिती दिली.

पुणे शहरात एकूण २२ अपघातप्रवण ठिकाणे म्हणजेच ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, वारंवार अपघात होणाऱ्या १२ कॉरिडॉरमध्ये विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. या भागांतील रस्त्यांची रचना, वाहतूक व्यवस्था आणि अपघातांची कारणे यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

रस्त्यांच्या डिझाइनमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यांवरील त्रुटी दूर करण्यावरही भर दिला जाणार आहे.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सेव्ह लाइफ फाऊंडेशन, परिवहन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध विभागांच्या समन्वयातून अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना करून पुण्यातील रस्ते अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57

तुळशी विवाह कधी? २१ नोव्हेंबर की २० नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Friday, 20 November 2026, 18:31

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी ३१ किमीची जमिनीखालील रस्ता बोगदा प्रणाली; बीकेसी, विमानतळ आणि द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार!

Friday, 20 November 2026, 18:30

अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार आक्रमक! सरकारला थेट अल्टिमेटम, ‘आजच नार्को टेस्ट करा’; नव्या दाव्याने खळबळ!

Friday, 20 November 2026, 18:12

इंदापुरात २५ नोव्हेंबरला भाजपच्या मोर्चाला राष्ट्रवादीचे प्रतिआव्हान! तहसीलदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काढणार प्रतिमोर्चा

Friday, 20 November 2026, 17:47
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp