Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी ३१ किमीची जमिनीखालील रस्ता बोगदा प्रणाली; बीकेसी, विमानतळ आणि द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 November 2026, 18:30

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण मुंबईहून थेट पालघरपर्यंतचा प्रवास जलद करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या उत्तन-विरार सागरी सेतूच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. आता समुद्रावर सागरी सेतू उभारण्याऐवजी हा मार्ग जमिनीवर कोस्टल रोडच्या स्वरूपात विकसित करण्याचा विचार पुढे आला आहे. सागरी सेतूसाठी सुमारे ५८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हा खर्च परवडणारा नसल्याने कोस्टल रोडचा पर्याय निवडण्यात येत आहे. या नव्या पर्यायामुळे सुमारे २० हजार कोटी रुपयांची बचत होणार असून, ३८ हजार कोटी रुपयांत हा मार्ग उभारण्याचे नियोजन आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाचे दोन सुधारित आराखडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केले. आता एमएमआरडीएकडून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात येणार आहे.

नव्या आराखड्यानुसार मरीन ड्राइव्ह ते पालघर असा सुमारे १०० किलोमीटरचा कोस्टल कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे मुंबईची थेट कनेक्टिव्हिटी वाढवण बंदरापर्यंत वाढणार आहे. या कॉरिडॉरचाच एक भाग म्हणून उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्याचे नियोजन होते. मात्र, केंद्र सरकारकडून निधी मिळण्यात अडचणी येत असल्याने आता हा मार्ग कोस्टल रोडच्या स्वरूपात विकसित करण्याचा विचार सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर प्रकल्पाचे दोन सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पहिल्या प्रस्तावानुसार हा मार्ग समुद्रकिनाऱ्याला लागून उभारण्यात येणार आहे. या मार्गावर दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन लेन असतील. या पर्यायासाठी सुमारे ३८ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या आराखड्यामुळे बांधकामांवर होणारा परिणाम तुलनेने कमी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसऱ्या प्रस्तावानुसार हा मार्ग प्रस्तावित विकास आराखड्यातील (DP Road) रस्त्यावरून नेण्याचा विचार आहे. मात्र, या मार्गावर अतिक्रमणे असल्याने ती हटवणे आव्हानात्मक ठरू शकते. तसेच भूसंपादनाचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पर्यायासाठी सुमारे ४२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीए सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) हा प्रकल्प उभारण्याचाही विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकल्पात विरार परिसरात दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. लोकवस्ती अधिक असलेल्या भागात एक भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तर दुसरा भुयारी मार्ग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाच्या खालून जाणार आहे. याशिवाय वसई, विरार आणि उत्तन या भागांत प्रवेशासाठी एकूण पाच इंटरचेंज प्रस्तावित आहेत.

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी एकात्मिक रस्ता-बोगदा प्रणाली उभारण्याची योजनाही एमएमआरडीएने मांडली आहे. या प्रणालीत वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून वांद्रे-कुर्ला संकुल (BKC), पुढे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जमिनीखालून जोडण्याचे नियोजन आहे.

एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार, या प्रणालीतील एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटरचा असेल. या प्रकल्पातून वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश आणि निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे.

या दोन्ही पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा उद्देश आहे. मात्र, उत्तन-विरार कोस्टल रोडचा अंतिम आराखडा आणि खर्च सविस्तर प्रकल्प अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57

तुळशी विवाह कधी? २१ नोव्हेंबर की २० नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Friday, 20 November 2026, 18:31

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी ३१ किमीची जमिनीखालील रस्ता बोगदा प्रणाली; बीकेसी, विमानतळ आणि द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार!

Friday, 20 November 2026, 18:30

अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार आक्रमक! सरकारला थेट अल्टिमेटम, ‘आजच नार्को टेस्ट करा’; नव्या दाव्याने खळबळ!

Friday, 20 November 2026, 18:12

इंदापुरात २५ नोव्हेंबरला भाजपच्या मोर्चाला राष्ट्रवादीचे प्रतिआव्हान! तहसीलदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काढणार प्रतिमोर्चा

Friday, 20 November 2026, 17:47

इराण-अमेरिका संघर्षात भारतीय जहाजांना लक्ष्य! 9 जहाजांवर विशेष नजर, केंद्र सरकारने वाढवली सुरक्षा!

Friday, 20 November 2026, 17:33
Next Post

तुळशी विवाह कधी? २१ नोव्हेंबर की २० नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp