Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंदापुरात २५ नोव्हेंबरला भाजपच्या मोर्चाला राष्ट्रवादीचे प्रतिआव्हान! तहसीलदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काढणार प्रतिमोर्चा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 November 2026, 17:47

आदित्य बोराटे

इंदापूर: इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनागोंदी कारभाराच्या मुद्द्यावरून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तहसीलदारांच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही तहसीलदारांच्या समर्थनार्थ त्याच दिवशी प्रतिमोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. चुकीची कामे करून घेण्यासाठी तहसीलदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी केला. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावरून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजपचे नेते प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन तहसील कार्यालयातील कथित अनागोंदी कारभार आणि तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. या कारभाराच्या निषेधार्थ २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर नगरपरिषदेपासून प्रशासकीय भवनापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.

या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ प्रतिमोर्चा काढण्याची भूमिका घेतली आहे. तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य प्रवक्ते अॅड. राहुल मखरे आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संजय सोनवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

यावेळी कोकाटे म्हणाले, “तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या समर्थनार्थ हा प्रतिमोर्चा काढण्यात येणार आहे. भाजप नेते प्रवीण माने यांच्या नवीन कंपनीच्या कामकाजासाठी तहसीलदारांवर दबाव आणून चुकीची कामे करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, अॅड. राहुल मखरे यांनी विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन अर्थात ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून भाजपला लक्ष्य केले. इंदापूर तालुक्यात भाजपला अनुकूल ठरेल अशा पद्धतीने मतदार यादी तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयआर प्रक्रियेत प्रशासकीय पातळीवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून, ते टाळण्यासाठी तहसीलदारांवर दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

संजय सोनवणे यांनी उजनीवरील प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. भाजप नेत्यांना शेतकऱ्यांची खरोखरच काळजी असती, तर त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असता, असे ते म्हणाले. तसेच एसआयआर प्रक्रियेद्वारे दलित आणि मुस्लिम मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी तहसीलदारांवर दबाव आणला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

भाजपकडून आरोपांवर प्रत्युत्तर

राष्ट्रवादीच्या आरोपांना उत्तर देताना भाजपचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे म्हणाले, “‘एसआयआर’ प्रक्रियेतील हरकतींचा विषय आता सुरू झाला आहे. मात्र, इंदापूर तहसीलदारांच्या अनियमित कामकाजाबाबत गेल्या चार महिन्यांपासून तक्रार अर्ज असून, त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. डेटा सेंटरबाबत सध्या प्राथमिक काम सुरू असून, यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते आपली भूमिका जाहीर करतील.”

यावेळी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन लोंढे, सचिन सपकाळ, अतुल झगडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, अनिकेत वाघ, शेखर पाटील, स्वप्निल राऊत आदी उपस्थित होते.

२५ नोव्हेंबरला एकाच दिवशी निघणारे दोन मोर्चे, त्यातून होणारे आरोप-प्रत्यारोप आणि तहसीलदारांच्या समर्थनार्थ व विरोधातील भूमिका यामुळे इंदापुरातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. आता या दोन्ही मोर्चांमधून कोणती भूमिका अधिक प्रभावी ठरते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57

तुळशी विवाह कधी? २१ नोव्हेंबर की २० नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Friday, 20 November 2026, 18:31

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी ३१ किमीची जमिनीखालील रस्ता बोगदा प्रणाली; बीकेसी, विमानतळ आणि द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार!

Friday, 20 November 2026, 18:30

अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार आक्रमक! सरकारला थेट अल्टिमेटम, ‘आजच नार्को टेस्ट करा’; नव्या दाव्याने खळबळ!

Friday, 20 November 2026, 18:12

इंदापुरात २५ नोव्हेंबरला भाजपच्या मोर्चाला राष्ट्रवादीचे प्रतिआव्हान! तहसीलदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काढणार प्रतिमोर्चा

Friday, 20 November 2026, 17:47

इराण-अमेरिका संघर्षात भारतीय जहाजांना लक्ष्य! 9 जहाजांवर विशेष नजर, केंद्र सरकारने वाढवली सुरक्षा!

Friday, 20 November 2026, 17:33
Next Post

अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार आक्रमक! सरकारला थेट अल्टिमेटम, ‘आजच नार्को टेस्ट करा’; नव्या दाव्याने खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp