हनुमंत चिकणे :
Dr. Amol Kolhe : लोणी काळभोर, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावर पुढील पंचविस वर्षातील वहातुक कोंडी लक्षात घेऊन, हडपसर (रविदर्शन) ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) या दरम्यान मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपुलाचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला असुन, मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे अंतीम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. शिरुरचा खासदार या नात्याने शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध महामार्गाच्या कामासाठी मागील चार वर्षाच्या काळात देशात सर्वाधीक असा सुमारे ३० हजार कोटी रूपयांचा निधी खेचुन आनल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोणी काळभोर येथे दिली. (Dr. Amol Kolhe)
पुणे-सोलापुर महामार्गाप्रमानेच नगर मार्गावर चंदननगर ते शिक्रापुर या दरम्यान मंजुर झालेल्या मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपुलाचे काम पुढील कांही दिवसात सुरु होणार आहे. रविदर्शन ते उरुळी कांचन व चंदननगर ते शिक्रापुर या दरम्यानच्या उड्डानपुलाचे काम सुरु झाल्यावर, वरील दोन्ही मार्गावरील वहातुक कोंडी कायमचीच संपेल असा विश्वासही डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. (Dr. Amol Kolhe)
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, यांच्या उपस्थितीत शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्तांना मार्गदर्शन करतांना खासदार डॉ. कोल्हे यांनी वरील माहिती दिली. (Dr. Amol Kolhe)
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी अध्यक्ष राजेंद्र खांदवे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सदस्य हिरामण काकडे, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, श्रीनाथ ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, माजी सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच ललिता राजेंद्र काळभोर, सुभाष टिळेकर, अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, रामदास चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Dr. Amol Kolhe)
यापुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “पुणे ते नगर, नाशिक महामार्ग, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आदी मोठे प्रकल्प मार्गी लागला आहेत.पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करावी, यासाठी मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतलेल्या आहेत. भूसंपादनातील बहुतांशी आक्षेपांचे निराकरण करण्यात यश आले आहे. दिल्लीत अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अंतिम बैठक लवकरच होणार असून या बैठकीत रस्त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होणार आहे. (Dr. Amol Kolhe)
आमदार अशोक पवार म्हणाले,
“राज्यातील सरकार लोकहिताच्या कामांकडे दुर्लक्ष करीत आहे. राजकीय व्यक्तींसह सर्वसामान्य माणसालाही वेठीस धरीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाही.’ महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक निधी सर्व आमदारांना देण्याचे काम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. मात्र आताचे सरकार निधी देण्यास टाळाटाळ करीत आहे. शिरूर हवेली मतदार संघात आजपर्यंत नागरिकांच्या, महावितरणच्या, हॉस्पिटलच्या समस्या सोडविण्यावर जास्त करून भर दिला आहे. प्रत्येकाला वाटते आमदारांनी, खासदारांनी वेळ द्यावा मात्र, वाघोली, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, उरुळी कांचन या चार गावांची लोकसंख्या ५ लाखांच्या पुढे आहे. तर शिरूर हवेलीतील ९५ गावे आहेत. तेथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीहि वेळ द्यावा लागत असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.