गणेश सूळ
Daund News : दौंड : पुणे जिल्हा बँक ही आशिया खंडात टॉपला नेण्याचे काम जसे मी केले, त्याचप्रकारे दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. असे आश्वासन माजी आमदार तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रमेश आप्पा थोरात यांनी दिले.(Will always strive for the overall development of Daund Taluka; Former MLA Ramesh Thorat)
खुटबाव येथे एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठीची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. महानंदच्या अध्यक्षा वैशाली नागवडे, अध्यक्ष नानासो थोरात, सरपंच अविनाश चव्हाण, महेश थोरात, सरपंच, उपसरपंच, सदस्य, (Daund News) सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व पक्षाचे आजी माझी पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी
आगामी निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी, परिपूर्ण नियोजन, कार्यकर्त्याची एकजूट अशा प्रकारच्या विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. (Daund News) भविष्यात दौंड तालुक्याच्या हितासाठी सर्वांगीण विकाससाठी विविध योजना राबविणे व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत त्या तळागाळातील सर्व सामान्य गोर गरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.
दरम्यान, आत्ता पर्यंत च्या कारकिर्दी मध्ये बाजार समितीमध्ये 2002,2007,2015 निवडणुकीमध्ये रमेश थोरात यांचे वर्चस्व होते. परंतू नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकामध्ये दौंड बाजार समितीची निवडणूक चंगलीच लक्ष वेधी ठरली. (Daund News) या निवडणुकी मध्ये मतदारांनी राष्ट्रवादी व भाजप ला प्रत्येकी 9-9 जागा जिंकत समसमान कौल दिला.
परंतु, निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादी चे नवनिर्वाचित संचालक संपत ( आप्पा )निंबाळकर यांचे आकस्मित निधन झाले . (Daund News) त्यामुळे अशा दैवयोगी अडचणी मुळे बाजार समितीमध्ये आपल्याला थांबावे लागले आहे परंतू अजूनही वेळ गेलेली नाही हा मूलमंत्र जोपासत कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : देलवडी येथील जय मल्हार विद्यालयाचा ९२.१० टक्के निकाल; निकालात मुलींनी मारली बाजी
Daund News : रावेर तालुका कृषी अधिकारीपदी काळेवाडीचे सुपुत्र भाऊसाहेब वाळके यांची निवड….
Daund News : दौंडचे तहसीलदार दिवटे यांनी घेतला पालखी मार्गाचा आढावा….