पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या महाराष्ट्रात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ अर्थात GBS चा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यात रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. पुण्यात आत्तापर्यंत अनेक केसेस समोर आले आहेत. GBS मुळे रुग्णाला वेळेवर उपचार न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळीच लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.

GBS हा आजार टाळण्यासाठी बाहेरचे अन्न खाणे टाळावे. हा आजार टाळण्यासाठी चीज, तांदळाचे पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. चीज आणि कॉटेज चीज हे दुग्धजन्य पदार्थ आहेत आणि या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया होण्याची शक्यता जास्त असते. या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते, ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. तसेच फळे आणि भाज्या धुवून खाव्यात आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावेत.
काही खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आर्द्रता असते ज्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. शिजवलेल्या भातामध्ये बॅसिलस सेरियस असू शकतो, जे खोलीच्या तापमानावर ठेवल्यास फूड पॉयझनचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.








