नवी दिल्ली : सध्या बहुतांश कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज प्लान्स महाग झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे. असे असताना आता TRAI च्या आदेशानंतर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी नवीन रिचार्ज प्लान्स लॉन्च केले आहेत. हे प्लान केवळ कॉलिंग आणि एसएमएस करू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी जारी करण्यात आले आहेत.

TRAI ने सांगितले की, टेलिकॉम कंपन्यांच्या योजना डेटावर केंद्रित आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी काही कॉलिंग आणि एसएमएस प्लान्सही लाँच केले पाहिजेत. यानंतर कंपन्यांनी नवीन प्लान्स लाँच केले आहेत. कंपनीने दोन प्लान लाँच केले आहेत. एअरटेलचा पहिला प्लान 469 रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 900 एसएमएस आणि अतिरिक्त सेवा मिळतात.
Jio ने दोन रिचार्ज प्लॅन देखील लाँच केले आहेत. 84 दिवसांची वैधता असलेला कंपनीचा प्लान 448 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त कॉलिंग आणि एसएमएस सुविधा मिळतात. या प्लानसह कंपनी पूर्ण वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 1000 एसएमएस मिळत आहे








