(Baramati Crime) बारामती : गोबर गॅसच्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खांडज (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाट्याजवळील आटोळेवस्ती येथे आज बुधवारी (ता.१५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे आणि बापुराव लहूजी गव्हाणे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण आटोळे हा गोबर गॅसच्या टाकीमध्ये तोल जाऊन पडला. प्रविण हा टाकीतील कालवलेल्या शेणात फसला. मुलाला वाचवण्यासाठी वडील भानुदास आटोळे आणि प्रकाश आटोळे हे टाकीत उतरले. पंधऱा मि्नीटाहुन अधिक काळ टाकीतुन कोणीही बाहेर येत नसल्याचे ते पाहुन तिघांना वाचविण्यासाठी शेजारी राहत असलेले बापुराव गव्हाणे हे टाकीत उतरले. मात्र दुर्दैवाने टाकीत उतरलेल्या चौघांचाही गुदमरून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या चौघांनाही बारामतीतील सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता, येथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या दुर्दैवी घटनेत वडील, मुलगा, चुलता आणि शेजारी अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि अनेकांना धक्का बसला.
एकवर्षापूर्वी लोणी काळभोर येथे अशीच घटना घडली होती.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथे २ मार्चला एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना, टाकीत गुदमरुन तब्बल चौघांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५) रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली), पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर, सोलापूर) आणि रुपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे, (वय- ४५, रा. सध्या घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ गाव केळेवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) या चौघांचा मृत्यु झाला होता. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Baramati Crime : बारामतीतील लघु पाटबंधारे विभागाचा इंजिनियर अडीच लाखाच्या लाच प्रकरणी गोत्यात!
Pune Crime : किरकोळ कारणावरून तरुणावर धारधार हत्याराने वार; आंबेगाव बुद्रुक येथील घटना