सकाळी चहा पिल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. चहा हे अत्यंत उत्साहवर्धक पेय मानले जाते. त्यातही आल्याचा चहा पिल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात. ते कोणते जाणून घेऊ..
आल्याच्या चहा पिण्याचे फायदे:
1. पचनाच्या समस्येपासून आराम: आल्याचा चहा पिल्याने पचनसंस्थेस चालना मिळते. गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करण्यास मदत होते.
2. सर्दी-खोकला व तापात उपयोगी: आल्यात अँटीव्हायरल व अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे सर्दी, खोकला आणि ताप यावर आराम मिळतो.
3. जळजळ कमी करते: आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी (दाह कमी करणारे) गुणधर्म असतात. सांधेदुखी, अंगदुखी, मणक्याचा त्रास अशा वेळी आराम मिळतो.
4. रक्ताभिसरण सुधारते: आले रक्ताभिसरण सुरळीत करते, त्यामुळे थंडीच्या दिवसांत चहा शरीरास गरम ठेवतो.
5. थकवा कमी करण्यास मदत: आलेचा चहा ऊर्जा वाढवतो, आणि मानसिक ताणतणाव कमी करतो.
तुम्हाला जर प्रवासात मळमळ अथवा उलटीचा त्रास होत असेल तर तुम्ही आल्याचा चहा प्यायला हवा. थंडीच्या दिवसांत हा चहा घेतल्यास अधिक फायदा होतो.
(टीप: सदर माहिती वाचकांसाठी पुरवण्यात येत आहे. पुणे प्राईम न्यूज यातुन कोणताही दावा करत नाही)